सिद्धार्थच्या वाढदिवशीच 'शेरशाह'चा फर्स्ट लूक रिलीज

'UNTOLD TRUE STORY...'

Updated: Jan 16, 2020, 01:39 PM IST
सिद्धार्थच्या वाढदिवशीच 'शेरशाह'चा फर्स्ट लूक रिलीज title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आज त्याचा ३५वा वाढदिवस साजरा करतोय. याचदिवशी सिद्धार्थ त्याच्या आगामी 'शेरशाह' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सिद्धार्थच्या वाढदिवशीच त्याच्या आगामी 'शेरशाह' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. सिद्धार्थच्या चित्रपटाचा हा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असून सिद्धार्थचा एक वेगळाच अंदाज सर्वांसमोर आला आहे.

'शेरशाह' चित्रपट कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. सिद्धार्थ या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शेअर करण्यात आलेल्या फर्स्ट लूकमध्ये सिद्धार्थ युद्धभूमीवर लढताना पाहयला मिळतोय. सोशल मीडियावर सिद्धार्थच्या या लूकला प्रेक्षकांची पंसतीही मिळतेय. 

 
 
 
 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra) on

पाकिस्तानी सेनेत विक्रम बत्रा यांची इतकी दहशत होती की, त्यांना 'शेरशाह' हे कोडनेम ठेवण्यात आलं होतं. चित्रपटाचं नावही त्यांच्या याच नावावरुन ठेवण्यात आलं आहे. जून १९९९ मध्ये त्यांच्या पहिल्या तुकडीला कारगिल युद्धासाठी पाठवण्यात आलं होतं. युद्धादरम्यान केलेल्या यशस्वी कामगिरीनंतर त्यांना 'कारगिलचा शेर' असंही बोललं जातं. 

'शेरशाह' चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केलंय. तर चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली आहे. सिद्धार्थ मल्होत्रासह चित्रपटात कियारा आडवाणी, परेश रावल, जावेद जाफरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'शेरशाह' ३ जुलै २०२० रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

सिद्धार्थने करण जोहरच्या 'स्टूडेन्ट ऑफ द ईयर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर 'हंसी तो फंसी', 'ब्रदर्स', 'बार-बार देखो', 'जबरिया जोडी', 'एक विलेन', 'कपूर ऍन्ड सन्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारली आहे. आता एका वेगळ्या भूमिकेत सिद्धार्थला चाहत्यांची पसंती मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.