श्रुती हसनचा बॉयफ्रेंन्डसोबतचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड आणि साउथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असते.

Updated: Jul 18, 2021, 03:21 PM IST
 श्रुती हसनचा बॉयफ्रेंन्डसोबतचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड आणि साउथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने असे काही फोटो पोस्ट केले ज्यामुळे सोशल मीडियावर फक्त श्रुतीचीच चर्चा सुरुये. 

श्रुती बॉयफ्रेंडसोबत दिसली होती
श्रुती हासनला तिचा बॉयफ्रेंन्ड शंतनू हजारिकाबरोबर बर्‍याचदा स्पॉट केलं जातं आणि सोशल मीडियावर ती त्याच्या सोबतचे फोटोही शेअर करते. नुकतीच श्रुती हासन तिची बेस्ट फ्रेंड्स अमृता राम आणि शांतनु हजारिकासोबत मुंबईमध्ये किराणा दुकानात गेली होती. याचीच एक झलक अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

बॉयफ्रेंडला किस 
श्रुति हसनने नुकतीच इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ती सुपरमार्केट मध्ये आपली मैत्रीण अमृता रामला मिठी मारतानाचे फोटो आणि याचबरोबर ती तिच्या बॉयफ्रेंन्डला किस करतानाचे फोटो शेअर केले होते. या फोटोंत दोघांनी एकसारखेच मास्क देखील घातले आहेत.

श्रुतीचे चित्रपट
श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर श्रुती हसन गेल्यावर्षी पवन कल्याणच्या 'वकील साब' या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती प्रभाससोबत 'सलार' चित्रपटात दिसणार आहे. श्रुती हासनने 2009 साली 'लक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. याशिवाय 'डी-डे', 'रमय्या वस्तावैय्या', 'गब्बर इज बॅक', 'वेलकम बॅक' यासारख्या बर्‍याच चित्रपटात श्रुतीने काम केलंय.