रक्ताच्या थारोळ्यात श्रियाला पाहून हादरा; आता पुन्हा देतेय सर्वांना धक्का

अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर आज 32वा वाढदिवस...श्रियाने अनेक हिंदी वेबसीरिज तसंच सिनेमांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Updated: Apr 25, 2022, 12:35 PM IST
रक्ताच्या थारोळ्यात श्रियाला पाहून हादरा; आता पुन्हा देतेय सर्वांना धक्का  title=

मुंबईः मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकरचा जन्म 25 एप्रिल 1989 रोजी झाला.

लहानपणापासून श्रियाला स्विमिंगची आवड असल्याने श्रियाने स्विमिंगचं व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं आहे. शालेय जीवनात स्विमिंगसाठी श्रियाला अनेक मेडल्सही मिळाले आहेत.

लहानपणी श्रियाने भाषांतराकर होण्याचं ठरवलं होतं, त्यासाठी ती जपानी भाषाही शिकली. मात्र त्यानंतर हा विचार सोडून तिनं मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्र विषयात पदवी घेतली. तसंच कथ्थक नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं.  त्यानंतर पुणे तसंच अमेरिकत तिनं अभिनयाचं प्रशिक्षणही घेतलं.

तुम्हाला माहिती नसेल मात्र वयाच्या 5व्या वर्षीच श्रियाने अभिनयाला सुरुवात केली होती. तू तू मैं,मैं या मालिकेत बिट्टू नावाच्या मुलाची भूमिका श्रियाने केली होती.

2012मध्ये श्रियाने खऱ्या अर्थाने करियरला सुरुवात केली. 'फ्रीडम ऑफ लव' या नाटकातून श्रियाने रंगभूमीवर पाऊल ठेवलं.. त्यानंतर 2013मध्ये वडील सचिन पिळगावकर यांच्यासोबत 'एकुलती एक' या मराठी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.

2016मध्ये श्रियाने शाहरूख खानच्या 'फॅन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या भूमिकेसाठी 750 मुलींमधून तिची निवड झाली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं.

त्यानंतर वेबसिरीजमधून खऱ्या अर्थाने श्रियाला ओळख मिळाली. 2018मध्ये आलेल्या 'मिर्झापूर' वेबसिरीजमधील भूमिकेमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. 

मिर्झापूरमध्ये स्विटीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून श्रियाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता श्रिया आगामी गिल्टी माईंड्स वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

शाहरूख खानसह बाहुबलीतील 'भल्लालदेव' अर्थात राणा दगुबत्तीसोबतही श्रियाने काम केलं आहे.