....नाहीतर सलमानचा खेळ खल्लास; प्रेयसी, पैसा, प्रसिद्धीपेक्षाही त्याला महत्त्वाचं ते काय ?

सलमानच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्वं कोणाला आहे ?

Updated: Apr 25, 2022, 11:56 AM IST
....नाहीतर सलमानचा खेळ खल्लास; प्रेयसी, पैसा, प्रसिद्धीपेक्षाही त्याला महत्त्वाचं ते काय ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : 'एक बार मैने जो कमिटमेंट कर दी... तो मै अपने आप की भी नही सुनता....', असं म्हटलं की निर्विवादपणे एक चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. हा चेहरा म्हणजे अभिनेता सलमान खान याचा. गेली अनेक दशकं हिंदी चित्रपट विश्व गाजवणारा सलमान त्याच्या अनोख्या जीवनशैलीसाठी ओळखला जातो. (Bollywood Actor Salman khan) 

यारों का यार, अशी त्याची ओळख. पण, तुम्हाला माहितीये का; ही प्रसिद्धी, कामामुळं आलेला अमाप पैसा या साऱ्यापेक्षाही सलमानच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्वं कोणाला आहे ? (Bollywood news )

अर्थात त्याच्यासाठी कुटुंबाचं स्थान अग्रगण्य आहे. पण, यापेक्षाही सलमानला वेळोवेळी सावध करणारी, त्याची अखंड साथ देणारी एक गोष्ट म्हणजे त्याच्या हातात असणारं एक ब्रेसलेट. 

सलमान लहान होता तेव्हा वडील सलीम खानं यांना हेच ब्रेसलेट घातलेलं तो पाहत होता. जेव्हा त्यानं या कलाजगतामध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला हेच ब्रेसलेट भेट म्हणून दिलं आणि तेव्हापासूनच ते त्याची साथ देत आहे. 

हे ब्रेसलेट खास असण्याचं कारण म्हणजे त्याची सकारात्मक उर्जा. या ब्रेसलेटमध्ये फिरोजा नावाचं मौल्यवान रत्नवजा खडा आहे. सलमानच्या मते यामुळं तो नकारात्मक गोष्टींपासून दूर राहतो. 

जेव्हा नकारात्मकता वाढते तेव्हा हा खडा आपोापच तडकतो, असं खुद्द सलमाननंच एका मुलाखतीत सांगितलं होतं. आतापर्यंत त्यानं 7 वेळा हे ब्रेसलेट बदललं आहे, कारण तितक्या वेळा त्यातील खडा नकारात्मकतेमुळं तडकला आहे. 

आता ही समजूत म्हणा किंवा आणखी काही, पण हे ब्रेसलेट नसतं तर... ? कल्पनाही करणं अशक्य होतंय ना? समजुती आणि विश्वासाचाच हा भाग. पण, सलमानचं हे ब्रेसलेट आजही त्याच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना त्याचा यावर असणारा विश्वास मनं जिंकून जातो.