पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजी क्या...'; डायलॉग ऐकताच Rashmika नं लाजत श्रेयसला दिली फ्लाइंग किस

Rashmika Mandanna लवकरच आपल्या मराठी कार्यक्रमात दिसणार आहे. स्टेजवर श्रीवल्लीला पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत. यावेळी रश्मिकानं आपला मराठमोळा पुष्पा म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत रोमान्स करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Mar 18, 2023, 04:15 PM IST
पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजी क्या...'; डायलॉग ऐकताच Rashmika नं लाजत श्रेयसला दिली फ्लाइंग किस title=

Shreyas Talpade flirts With Rashmika Mandanna In Marathi Show : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही भारतीय तरुणांचं क्रश आहे असं म्हणायला हरकत नाही. रश्मिकानं पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्यानं सगळ्यांना वेड लावले होते. त्या गाण्याचं तर सगळ्यांना वेड लावलं होतं. रश्मिता आता मराठमोळ्या स्टेजवर दिसत आहे. रश्मिका पहिल्यांदाच मराठी कार्यक्रमात दिसणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रश्मिका कोणत्या कार्यक्रमात दिसणार आहे. तर रश्मिका ही लवकरच झी चित्र गौरव पुरस्कार 2023 मध्ये रश्मिका मंदाना आपल्याला डान्स करताना दिसणार आहे. इतकंच काय तर यावेळी रश्मिका मराठी गाण्यावर डान्स करणार आहे. 

श्रीवल्लीला मराठी कार्यक्रमात पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर आपण आहेत. यावेळी आपल्या सगळ्यांचा मराठमोळा पुष्पा म्हणजेच पुष्पा या चित्रपटातील हिंदी डबिंगमध्ये अभिनेता अल्लू अर्जुननं साकारलेल्या पुष्पा या भूमिकेला आवाज देणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) देखिल दिसणार आहे. झी चित्र गौरव पुरस्कार 2023 मध्ये श्रेयस हा सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी रश्मिकाला पाहून श्रेयस तिच्यावर फिदा झाला हे म्हणायला हरकत नाही. श्रेयसनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Rashmika Mandanna dance In Marathi Show)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओत आपण पाहू शकतो की जेव्हा रश्मिका मंदानाची एन्ट्री होते. तेव्हा श्रेयस तिच्यासोबत फ्लर्ट करत पुष्पा चित्रपटातील त्याचे डायलॉग बोलताना दिसतो. 'पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजी क्या... फायर है फायर' त्यानंतर रश्मिका लाजते आणि डोळा मारत श्रेयसला फ्लायइंग किस देते. हा व्हिडीओ शेअर करत श्रेयसनं कॅप्शन दिलं की Srivalli सिर्फ मेरेकु देखि नही…मेरेकु पप्प्प्पी भी दी ना भाऊ…. प्यार होगया full to अपुनको… झूठ लगताय???तर बघाच मग… श्रेयसनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Shreyas Talpade flirts With Rashmika Mandanna In Marathi Show)

हेही वाचा : 'पैसे कमावणारा नवरा हवा...' मुलींच्या या इच्छेत गैर काय? सोनालीच्या 'त्या' व्हिडीओवर Urfi Javed चं उत्तर

झी गौरव कधी आणि कुठे पाहता येईल?

26 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता झी चित्र गौरवचं टेलिकास्ट होणार आहे. रश्मिकाला यावेळी मराठी स्टेजवर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान, रश्मिकाचा नुकताच 'मिशन मजनू' (Mission Majnu) या चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिच्यचासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) दिसला होता.