VIDEO : '...मग काय होतं, ते मी भोगलंय'; केक कट करण्याआधी श्रेयस तळपदेनं केली अशी प्रार्थना

Shreyas Talpade :  श्रेयस तळपदेनं पापाराझी आणि चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, केक कट करण्याआधी देवाकडे प्रार्थना मागत म्हणाला...

दिक्षा पाटील | Updated: Jan 28, 2024, 11:19 AM IST
VIDEO : '...मग काय होतं, ते मी भोगलंय'; केक कट करण्याआधी श्रेयस तळपदेनं केली अशी प्रार्थना title=
(Photo Credit : Social Media)

Shreyas Talpade : काल 27 जानेवारी रोजी अभिनेता श्रेयस तळपदेनं त्याचा 48 वा वाढदिवस साजरा केला. गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याची एंजियोप्लास्टी करण्यात आली. 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या सेटवरून परताना त्याला अवस्थवाटू लागलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात आणण्यात आलं. आता तो ठीक आहे आणि त्यानं पापाराझींसोबत वाढदिवस साजरा केला आहे.  

श्रेयस तळपदेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यात तो पिवळ्या रंगाचं टी-शर्ट आणि डेनिम परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा एक व्हिडीओ फिल्मी ग्याननं शेअर केला आहे. या व्हिडीओत पापाराझींनी त्याला विचारलं की सर आधी पेक्षा आता कसे आहात? तर श्रेयस म्हणाला, आधी पेक्षा खूप ठीक आहे. त्यानंतर त्यानंच त्यांना विचारलं की कसा दिसतोय? पापाराझी म्हणाले की खूप मस्त दिसताय, सर. तर श्रेयस म्हणाला हेच तर ऐकायचं होतं. त्यानंतर श्रेयस पुष्पाची सिग्नेचर स्टेप करत केक कापताना दिसतो. त्याआधी श्रेयस देवाकडे प्रार्थना करतो की 'यावर्षी सगळ्यांना निरोगी राहु दे. कारण निरोगी असणं किती महत्त्वाचं आहे हे माझ्यापेक्षा जास्त कोणी समजू शकत नाही. निरोगी नसू तर काय होऊ शकतं. मी ते भोगलं आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणासोबत असं व्हायवं अशी माझी इच्छा नाही.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दुसऱ्या व्हिडीओत श्रेयस सुरुवातील पुष्पामधला डायलॉग बोलताना दिसतो. 'पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला!' मला हा दिवस माझ्या चाहत्यांसोबत आणि तुमच्यासगळ्यासोबत शेअर करायचा होता. त्यासोबत मला दिलेल्या इतक्या प्रेमासाठी, माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी  मला सगळ्यांचे आभार मानायचे होते आणि मी भाग्यवान आहे की मला तुमचं इतकं प्रेम पाहायला मिळालं. त्यासाठी देवाचे आभार.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : निक जोनसनं 'मान मेरी जान...' गाणं गाताच 'जीजू जीजू' ओरडे लागले चाहते!

श्रेयसला असं पाहून त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. सगळ्यांनी त्याला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'श्रेयस नेहमीच हसवत असतो आणि त्यामुळेच त्याच्यासोबत सगळ्यांचे आशीर्वाद आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुझं व्यक्तिमत्त्व खूप चांगलं आहे. तू नेहमीच निरोगी राहशील. गणपती बाप्पा मोरया.'