कतरिनाला सोडून Vicky Kaushal चा मराठमोळ्या श्रेया बुगडेसोबत रोमँटिक अंदाज

कतरिना कैफ नाहीतर मराठमोठ्या श्रेया बुगडेसोबत विकीचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर दोघांच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल   

Updated: Dec 5, 2022, 10:53 AM IST
कतरिनाला सोडून Vicky Kaushal चा मराठमोळ्या श्रेया बुगडेसोबत रोमँटिक अंदाज title=

Shreya Bugade and Vicky Kaushal Video : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) - अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा दोघांना निर्णय चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला तेव्हा दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विकी-कतरिनाच्या लग्नाचे फोटो देखील तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण आता विकीला चक्क मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडेसोबत (Shreya Bugade) स्पॉट करण्यात आलं. 

श्रेया आणि विकीचा एक रोमँटिक व्हिडीओ

श्रेया आणि विकीचा एक रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर, खुद्द श्रेयाने दोघांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये विकी आणि श्रेया रोमँटिक गाण्यावर डान्स करतना दिसत आहेत. श्रेयाने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर चाहते कमेंट करत आहेत. 

श्रेयाने व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'कियारा डुप्लिकेट असली तरी, विकी कौशल खरा आहे... प्रचंड आनंद... विलक्षण क्षणांसाठी आभार...' असं लिहिलं आहे. विकीसोबतचे खास क्षणांचा व्हिडीओ पोस्ट करत श्रेयाने #Lovemylife आणि #Howsthejosh असं हॅशटॅग देखील दिले आहेत... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकी कौशलचा आगामा सिनेमा
दरम्यान, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल, विकी श्रेयासोबत 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये (Chala Hawa Yeu Dya)  काय करतोय? तर विकी लवकरच 'गोविंदा मेरा नाम' (Govinda Naam Mera) सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 16 डिसेंबर रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात विकी शिवाय कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

विकी आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये आला होता. शोमध्ये अभिनेत्याने 'गोविंदा मेरा नाम' सिनेमातील 'बना शराबी' या रोमँटिक गाण्यावर श्रेयासोबत डान्स केला. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Shreya Bugade and Vicky Kaushal dance Video on the set Chala Hawa Yeu Dya)