Stree 2 Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’ चा धुमाकूळ, फक्त 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार

Stree 2 Box Office Collection: स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत स्त्री २ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

शिवराज यादव | Updated: Aug 17, 2024, 11:33 AM IST
Stree 2 Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’ चा धुमाकूळ, फक्त 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार  title=

Stree 2 Box Office Collection Day 2: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या स्त्री २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशीही चित्रपटाच्या कमाईवर काही परिणाम झालेला नाही. चित्रपटाची  बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौड कायम सुरु आहे. चित्रपटाने नेमकी किती कमाई केली आहे जाणून घ्या.

बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’ चा धुमाकूळ

स्त्री चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. यामुळेच त्याच्या सीक्वल कडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली असून प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर स्त्री २ चित्रपटाचा सामना अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में' आणि जॉन अब्राहमच्या 'वेदा'शी होता. पण स्त्री ने दोघांना मागे टाकले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

पहिल्याच दिवशी रचला इतिहास

स्त्री २ ने चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 76.50 कोटीची कमाई करत सर्व अंदाज खोटे ठरवले. दरम्यान आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. पहिल्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असल्याने चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. दुसरा दिवस वर्किंग डे असल्याने तुलेनेने कमी कमाई झाली असली तरी इतर चित्रपटांच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दुसऱ्या दिवशी किती कमाई केली?

स्त्री चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 30 कोटीची कमाई केली आहे. म्हणजे देशभरात 45 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. याचा अर्थ चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. फक्त दोन दिवसात चित्रपटाने 130 कोटीची कमाई करत एक नवा रेकॉर्ड केला आहे.

'स्त्री 2' हा 2018 मध्ये आलेल्या हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री'चा सिक्वेल आहे. पहिल्या भागातही चित्रपटाने चांगली कमाई केली होती. पण आता 2024 मध्ये रिलीज झालेल्या 'स्त्री 2' ने पूर्वीपेक्षा मोठा धमाका केला आहे. 'स्त्री 2' ने बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या 'पठाण'चा ओपनिंग रेकॉर्ड मोडीत काढला आहे. 'स्त्री 2' ज्या वेगाने कमाई करत आहे, ते पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित करू शकेल.