अभिनेत्यासोबत नाही, तर चक्क अभिनेत्रीसोबत अभिनेत्रींचा रॉमान्स; नावं ऐकून बसेल धक्का

आम्ही तुम्हाला आज अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांना ऑनस्क्रिन कोणत्याही अभिनेत्यासोबत नाही तर अभिनेत्रींसोबत करावा लागला रॉमेन्स. 

Updated: Jan 26, 2022, 04:17 PM IST
अभिनेत्यासोबत नाही, तर चक्क अभिनेत्रीसोबत अभिनेत्रींचा रॉमान्स; नावं ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या 'बधाई दो' या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला आहे. प्रत्येकजण या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. ट्रेलरमध्ये राजकुमार आणि भूमी एक सरप्राईज पॅकेज म्हणून समोर आले आहेत. 'बधाई दो'मध्ये राजकुमार पोलिस ऑफिसर आणि भूमी पीटी टीचरच्या भूमिकेत असणार असल्याची माहिती आधीच समोर आली होती, पण ट्रेलर समोर आल्यावर कथेत ट्विस्ट आला.

खरं तर, या चित्रपटात राज कुमार राव पुन्हा एकदा समलिंगी भूमिकेत दिसणार आहे, पण भूमीही या चित्रपटात लेस्बियनच्या भूमिकेत आहे. भूमीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या असल्या तरी ती पहिल्यांदाच लेस्बियन बनली आहे. ज्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी लोकांमध्ये आणखी जास्त उत्सुक्ता निर्माण झाली आहे.

पण पडद्यावर लेस्बियनची भूमिका साकारणारी भूमी पहिली अभिनेत्री नाही, याआधीही अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी अशा भूमिका साकारली आहे. आम्ही तुम्हाला आज अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांना ऑनस्क्रिन कोणत्याही अभिनेत्यासोबत नाही तर अभिनेत्रींसोबत करावा लागला रॉमेन्स. यामध्ये त्यांनी एकमेकांना किस देखील केलं आहे.

सोनम कपूर - 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटात सोनम कपूरने लेस्बियनची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव, अनिल कपूर हे देखील मुख्य भूमिकेत होते.

शबाना आझमी - नंदिता दास : 1996 मध्ये रिलीज झालेल्या दीपा मेहताच्या 'फायर' चित्रपटात नंदिता दास आणि शबाना आझमी यांनी लेस्बियनची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर नंदिता दास प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटात कुलभूषण खरबंदा आणि जावेद जाफरी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची कथा दोन महिलांच्या एकाकीपणावर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या नात्यावर आधारित होती. या चित्रपटात शबाना आणि नंदिता यांच्यात किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता, जो खूप चर्चेत होता आणि त्याकाळी अशा प्रकारचा सिनेमा काढणं ही खूप मोठी गोष्ट होती.

कल्की केंकला - सयानी गुप्ता: कल्की केंकला आणि सयानी गुप्ता यांनी 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ'मध्ये (Margarita with a Straw) लेस्बियन पात्र साकारले होते. सयानी या चित्रपटात कल्कीची प्रियकर बनली.

माधुरी दीक्षित - हुमा कुरेशी : माधुरी आणि हुमा 'देढ इश्किया'मध्ये लेस्बियन बनल्या होत्या. या चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींनी बेगमची भूमिका साकारली होती.

अमृता अरोरा - ईशा कोप्पीकर : अमृता अरोराने 2004 मध्ये रिलीज झालेल्या 'गर्लफ्रेंड' चित्रपटात सपना वर्माची लेस्बियन भूमिका साकारली होती.

क्रिती कुलकर्णी - क्रिती कुलकर्णीने अद्याप मोठ्या पडद्यावर लेस्बियनची भूमिका केलेली नाही, मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ह्यूमन' या मालिकेत क्रितीने लेस्बियनची भूमिका साकारली आहे. या मालिकेत क्रिती आणि शेफालीचा एक किसिंग सीन देखील आहे ज्याची खूप चर्चा आहे. परंतु शेफाली या मालिकेत लेस्बियन बनलेली नाही.