'बिग बॉस' फेम अभिनेत्रीवर मोठी शस्त्रक्रिया, लाईव्ह चॅटमध्ये ढसाढसा रडत म्हणाली...

बिग बॉस 15 मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या चाहत्यांना एक वाईट बातमी सांगितली आहे.

Updated: Jan 26, 2022, 04:02 PM IST
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीवर मोठी शस्त्रक्रिया, लाईव्ह चॅटमध्ये ढसाढसा रडत म्हणाली... title=

मुंबई : बिग बॉस 15 मधून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने तिच्या चाहत्यांना एक वाईट बातमी सांगितली आहे. टीव्ही स्टारने काल रात्री सोशल मीडियावर लाईव्ह चॅटिंगद्वारे चाहत्यांना तिच्या तब्येतीची माहिती दिली. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने तिच्या तब्येतीबद्दल सांगितलं आणि लवकरच तिला शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं सांगितलं.
 
अभिनेत्रीने सांगितलं की, तिला गुरुवारी रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. त्यानंतर शुक्रवारीच तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. देवोलिना भट्टाचार्जीने सांगितलं की, बिग बॉसच्या घरात केलेला पोल टास्क तिच्यावर भारी पडला. ज्यामध्ये 19 तास उभं राहिल्यानंतर ती खाली कोसळली. तेव्हा तिच्या पायाला दुखापत झाली. तिची प्रकृती ठीक नसल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. या घटनेमुळे तिच्या पायांचे नर्व डॅमेज झाले. त्यासाठी आता तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

देवोलीना भट्टाचार्जीने सांगितलं हा कंटेस्टेंट होणार विनर
या व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने तिच्या आवडत्या स्पर्धकाचं नाव देखील सांगितलं. अभिनेत्रीने सांगितलं की, तिच्या मते हा शो सहजपाल जिंकणार आहे. बिग बॉस 15 चा विजेता म्हणून अभिनेत्रीने प्रतीक सहजपालचं नाव घेतलं. अभिनेत्रीने सांगितलं की, तो तिचा आवडता स्पर्धक आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनेही शोचा स्पर्धक उमर रियाझबद्दल बोलताना सांगितलं की, उमर रियाझ एक चांगला माणूस आहे. ती पुढे म्हणाली की, या गेम शोमध्ये लोक चुका करतच असतात. कदाचित त्यांच्याकडूनही चूक झाली असावी. पण तो एक खरच खूप चांगला माणूस आहे. तसंच, अभिनेत्रीने सांगितलं की, उमर रियाजला गेम शोमधून काढून टाकण्यात आलं आहे हे मला आवडलं नाही.