मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कलाकारांना गाठलं आहे. कोरोनाचा थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांचा. कोरोनामुळे अनेक कलाकरांनी आपला जीव गमावला आहे.(Shocking Actress Abhilasha Pati died due to Corona Virus ) अशातच आणखी एक दु:खद माहिती समोर आली आहे. ‘बापमाणूस’ (Bapmanus) या मराठी मालिकेतील अष्टपैलू अभिनेत्री अभिलाषा पाटील (Abhilasha Patil) यांचं कोरोनाने निधन झालं आहे.
अभिलाषा पाटील या मराठी मधील एक अष्टपैलू कलाकार होत्या. त्यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. फक्त मराठी मालिकांमध्येच नव्हे तर मराठी आणि हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली आहे.
खूप मेहनत घेऊन काम करीत होतीस .... baapmanus ला आपण भेटलो होतो... आई होतीस माझी. . " नुसतं enjoy" असं म्हणून काम...
Posted by Pallavi Ajay on Tuesday, May 4, 2021
अभिलाषा यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका गाजवल्या आहेत. 'बायको देता का बायको', 'छिछोरे', 'प्रवास', यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. एवढंच नाही तर मालिकांमध्येसुद्धा त्यांनी उत्तम काम केलं आहे. अभिलाषा यांच्या निधनाची बातमी येताच मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.दुसऱ्या लाटेत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.
हिंदी मराठी कलाकारांना याचा फटका बसलाय. अभिलाषा शुटींगच्या निमित्ताने बनारसला गेल्या होत्या. मात्र तिथे त्यांची प्रकृती बिघडली होती. म्हणून त्यांनी परत मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये येऊन त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. आणि त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यांनतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या चार दिवस ICU मध्ये सुद्धा होत्या. मात्र अखेर त्यांचा कोरोनाशी लढा अपयशी ठरला. काळ त्यांनी अखेरचा श्वास घेतला.