व्हिडिओ : चिम्पांजीसोबत शिल्पाची धमाल...

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या फूड चॅनल आणि सोशल मीडिया पोस्ट्समुळे चर्चेत असते. 

Updated: Aug 9, 2018, 08:01 AM IST
व्हिडिओ : चिम्पांजीसोबत शिल्पाची धमाल... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या फूड चॅनल आणि सोशल मीडिया पोस्ट्समुळे चर्चेत असते. फिटनेस फ्रिक शिल्पाला फिरायलाही खूप आवडते. फॅमेली हॉलिडेजचे फोटोज ती नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शिल्पाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती चिम्पांजीसोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

शिल्पाचा हा व्हिडिओ इंस्टाग्राम फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला. यात एका पाळलेल्या चिम्पांजीला शिल्पा उचलून घेते. इतकंच नाही तर तो शिल्पाला किसही करतो. शिल्पासोबत या व्हिडिओत तिचा मुलगाही दिसत आहे. 

तुम्हीही पाहा हा व्हिडिओ...

 

#instabolly #bollywood

A post shared by Bollywood Entertainment (@lnstabolly) on

शिल्पा शेट्टी सध्या सिनेमांपासून दूर असली तरी टीव्ही वरील रियालिटी शो होस्ट करताना दिसत आहे.