शिल्पा शेट्टीच्या कुटुंबावर कठीण प्रसंग; 'आम्ही वेगळे झालोय....' म्हणत राज कुंद्राचं जाहीर वक्तव्य

Raj Kundra : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहे. राजने अलीकडेच त्याचा पहिला चित्रपट UT 69 ची घोषणा केली आहे. मात्र आता राज कुंद्राने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 20, 2023, 09:10 AM IST
शिल्पा शेट्टीच्या कुटुंबावर कठीण प्रसंग; 'आम्ही वेगळे झालोय....' म्हणत राज कुंद्राचं जाहीर वक्तव्य title=

Raj Kundra Viral Tweet: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) लवकरच 'UT69' चित्रपटात दिसणार आहे. मात्र आता चित्रपटाच्या चर्चांदरम्यानच राज कुंद्राची एक सोशल मीडिया पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. राज कुंद्राच्या या पोस्टमुळे शिल्पा (Shilpa Shetty) आणि तो वेगळे होणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या जोडीची बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा होते. कठीण काळातही शिल्पाने राज कुंद्राची साथ दिल्याचे पाहायला मिळालं आहे. मात्र आता त्याच्या पोस्टने एकच खळबळ उडवून दिली आहे. राज कुंद्राच्या पोस्टने या जोडप्याचे नाते संपुष्टात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. निदान राज कुंद्राच्या ट्विटवरून तरी हाच संकेत मिळत आहे.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून राज अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, राजने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. राजने सोशल मीडियावर वेगळे झाल्याची घोषणा केली आहे. जरी त्यांनी या पोस्टमध्ये कोणाचाही उल्लेख केलेला नाही. यानंतर चाहते चिंतेत पडले आहेत. चाहत्यांना वाटतंय की शिल्पा आणि राज वेगळे होत आहेत.

राज कुंद्राचे फक्त ट्विटच नाही तर त्याची इन्स्टाग्रामवरची पोस्टही व्हायरल होत आहे. राज कुंद्राने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 'आम्ही वेगळे होत आहोत आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे की, या कठीण परिस्थितीत आम्हाला वेळ द्या,' असे राज कुंद्राने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसोबत त्यांनी हात जोडून हृदयाची इमोजीही पोस्ट केली आहे. मात्र अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा तिने अशी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही.

राज कुंद्राच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने, 'वेगळे झाले.. घटस्फोट?' असा सवाल विचारला आहे. तर दुसर्‍या एका युजरने, 'त्याच्या मास्कबद्दल बोलत असावा,' असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने, 'तुला ही निरुपयोगी कल्पना कोणी दिली?' असा प्रश्न विचारला आहे. मात्र हे केवळ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आहे आणि राजच्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नसल्याचा अंदाज आहे. पण, सत्य काय आहे ते येणाऱ्या काळातच कळणार आहे.