मुंबई : व्हिडीओ स्ट्रीमिंग पोर्टल 'अमेझॉन प्राईम व्हिडिओ'वर पाहण्यासाठी असंख्य चित्रपट आहेत पण भारतात सर्वात जास्त पाहिला जाणारा चित्रपट कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्यदिनापूर्वी रिलीज झालेल्या 'शेरशाह' चित्रपटाने या पोर्टलवरील सर्व चित्रपटांचे सेट केलेले रेकॉर्ड मोडले आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)आणि कियारा आडवाणी स्टारर 'शेरशाह' (Shershaah) या चित्रपटाला लोकांचे आणि समीक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. देशासाठी शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra)यांच्या जीवनाची कथा सांगणारा हा चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आणि या चित्रपटाने ओटीटीवर विक्रमी कामगिरी केली आहे.
या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून अनेक विक्रम मोडले आहेत. एवढेच नाही तर, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट बनला आहे. पहिल्या दोन आठवड्यांत 'शेरशाह' (Shershaah) 4100 हून अधिक भारतीय लोकांनी पाहिला आहे. 210 देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
एकूणच, भारतातील अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील इतर कोणताही भारतीय चित्रपटाने या कालावधीत यापेक्षा जास्त लोकांनी पाहिलेला नाही. 88,000 पेक्षा जास्त IMDb वर मतदान केल्यानंतर शेवटी त्याला 8.9 रेटिंग मिळाले आहे.
शेरशाहने IMDb वर आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय हिंदी चित्रपट म्हणून एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे. सिद्धार्थ मल्होत्राने स्वतः ही माहिती इन्स्टा पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी चित्रपटात केलेल्या कामाचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे. किआरा अडवाणी (Kiara Advani) हिने चित्रपटात विक्रम बत्राच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.