तुझ्या ब्रेस्टला हाथ लावू शकतो का? Sherlyn Chopra कडे दिग्दर्शकानं केली होती विचित्र मागणी

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'पौरषपुर 2' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तिची ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असताना प्रमोशनसाठी देत असलेल्या मुलाखतीत शर्लिननं तिला करिअरमध्ये आणि खासगी आयुष्यात आलेल्या काही वाईट अनुभवांविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 23, 2023, 12:01 PM IST
तुझ्या ब्रेस्टला हाथ लावू शकतो का? Sherlyn Chopra कडे दिग्दर्शकानं केली होती विचित्र मागणी  title=
(Photo Credit : Social Media)

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकते. तर शर्लिन ही सध्या तिच्या 'पौरषपुर 2' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. लवकरच तिची ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये शर्लिन व्यस्त आहे. तिला अनेक ठिकाणी या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी स्पॉट करण्यात येते. कधी ती कोणाला गालावर किस करत त्यांना बर्थ डे गिफ्ट देते. तर विमानतळावर कोणत्या मुलासोबत अश्लील डान्स केल्यामुळे ती चर्चेत आली होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्लिननं तिच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी तिनं कसा कॉम्प्रोमाइज केला याविषयी देखील सांगितलं आहे. तर त्याशिवाय डायरेक्टर्स तिला सर्जरी करण्यासाठी सांगायचे. त्याचा या सगळ्याचा तिच्यावर नक्की काय परिणाम झाले हे तिनं यावेळी सांगितलं. 

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शर्लिन चोप्रानं तिच्या सोबत घडलेल्या काही विचित्र प्रकारांविषयी सांगितलं. शर्लिन म्हणाली, "मला दिग्दर्शकानं विचारलं होतं की मी ब्रेस्टची सर्जरी केली आहे. मी सर्जरी केली नाही असं खोटं बोलण्यासाठी माझ्याकडे काहीही कारण नव्हतं, मी त्यांना सांगितलं की मी सर्जरी केली आहे कारण मला माझ्या फ्लॅट चेस्टचा कंटाळ आला होता. तेव्हा ते म्हणायचे की मी तुझ्या ब्रेस्टला हात लावू शकतो का? तुझी कप साइज काय आहे? तेव्हा मला आश्चर्य झाले की कोणत्या अभिनेत्रीला तिची कप साइज विचारून तिला काम दिलं जातं का? मी त्यांना विचारलं की तुमचं लग्न झालं आहे का? कारण तेव्हा तुम्हाला एका महिलेच्या शारीरिक रचनेविषयी कळतंच. दिग्दर्शकानं सांगितलं की हा, पण मी माझ्या पत्नीशी जास्त बोलत नाही." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शर्लिन चोप्रा पुढे तिच्या आयुष्यात आलेल्या वाईट काळाविषयी सांगत म्हणाली, "2021 मध्ये तिची एक किडनी फेल झाली होती. मी विचार केला की माझ्यासाठी त्यावेळी वेळ संपली होती. माझ्या कुटुंबाकडून कोणतीही मदत मिळाली नाही तरी देखील मी हार मानली नाही. कोणीच ट्रान्सप्लांटची ऑफर देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला नाही. पण जेव्हा परिस्थिती ठीक होऊ लागली होती तेव्हा मी माझ्या आयुष्यातील एकही क्षण वाया जाऊ न देण्याचं ठरवलं. मी आनंदानं माझं आयुष्य जगू लागली." 

हेही वाचा : ब्रा आणि ओल्ड मॉन्क... सेन्सॉरनं 'रॉकी और रानी...'वर चालवली कात्री; ममता बॅनर्जींचा उल्लेख वगळण्याचाही सल्ला

शर्लिन चोप्राला सिद्धार्थनं पुढे पैशांसाठी ती अनेकांसोबत झोपली आहे या तिच्या स्टेटमेंट विषयी विचारलं. यावर उत्तर देत शर्लिन म्हणाली, तुला निराश करण्यासाठी मी माफी मागते पण आता मी पैसे घेऊन कोणासोबत झोपत नाही. यावर स्पष्टीकरण देत तिनं पुढे सांगितलं की तिचा एक्स बॉयफ्रेंड जो एका मोठ्या राजकारण्याचा मुलगा होता, तो ज्या प्रकारे तिला ट्रीट करायचा, त्यावरून तिला हेच वाटायचं की हे सगळं फक्त सेक्ससाठी आहे.