मुंबई : सिद्धार्थ शुक्लाला जाऊन आता तीन आठवडे झाले आहेत. मात्र शहनाज गिल अजूनही हे सिद्धार्थच्या जाण्याचं दुःख विसरलेली नाही. आजही शहनाजचे अनेक प्रोजेक्ट अर्धवट राहिले आहेत. आता आशा आहे की, शहनाज लवकरच प्रोजेक्ट सुरू करू शकेल. शहनाज गिलने पंजाबी सिनेमा 'हौंसला रख' साइन केली आहे. ज्यामध्ये ती अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे.
15 सप्टेंबर रोजी सिनेमाच्या गाण्याचं शुटिंग होणार होतं. मात्र सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शहनाज पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यामुळे मेकर्सने सिनेमाच्या गाण्याचं शुटिंग पुढे ढकललं आहे. सिनेमाचे प्रोड्यूसर दिलजीत थिंडने सांगितलं की, शहनाजच्या तब्बेतीत सुधारणा होण्याची वाट पाहत आहोत. कारण ती अजूनही धक्क्यात आहे.
सिद्धार्थ शुक्लाचे 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो बिग बॉस 13 चा विजेता होता. या शोमध्ये शहनाज आणि सिद्धार्थची जोडी सिडनाज बनली. जे लोकांना खूप आवडले. सिद्धार्थ गेल्यापासून शहनाजने स्वतःला घरात बंद करून घेतले आहे. सध्या तिच्यासाठी सिद्धार्थ असं अचानक जाणं पचवणं खूप कठीण आहे. सर्वांना आशा आहे की शहनाज पुन्हा एकदा परत येईल.
दुसरीकडे, शहनाजचे चाहते तिच्या कमबॅककरता प्रार्थना करत आहेत. सोशल मीडिया पेजवर सर्व चाहते तिला मेसेज करताना आणि तिला आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. एका युझरने लिहिले की शहनाज गिलला अधिक ताकद मिळाली पाहिजे.