'यापेक्षा मरण बेहत्तर...', शहनाज गिलनं इंडस्ट्रीविषयी केला धक्कादायक खुलासा

Shehnaaz Gill dark side of industry : शहनाज गिलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत नाही त्यांचं आयुष्य खूप चांगलं आहे असं सांगितलं. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 30, 2023, 03:00 PM IST
'यापेक्षा मरण बेहत्तर...', शहनाज गिलनं इंडस्ट्रीविषयी केला धक्कादायक खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Shehnaaz Gill dark side of industry : पंजाबची कतरिना कैफ अशी ओळख असणारी अभिनेत्री शहनाज गिलची खास ओळख करून देण्याची काहीही गरज नाही. शहनाजला खरी ओळख ही 'बिग बॉस 13' मधून मिळाली. त्यानंतर शहनाज गिलनं बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोत काम केलं. सध्या शहनाजही तिचा आगामी चित्रपट 'थॅंक्यू फॉर कमिंग' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शहनाज चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशात शहनाजनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये रहायचं असेल तर काय करावं लागतं याविषयी सांगितलं आहे. 

बॉलिवूडमध्ये राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय?

शहनाजनं नुकतीच एक मुलाखत दिली असून यावेळी बॉलिवूडमध्ये स्वत: स्थान कायम ठेवायचे असेल तर बॉडीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शहनाज म्हणाली की 'जर मी इथे काम करत नसते, तर मी तिच लठ्ठ शहनाज गिल असते. पण बॉलिवूडमध्ये तुम्हाला तुमची बॉडी मेनटेन ठेवावी लागते. मला काही दिवासांपूर्वीच एका व्यक्तीनं लठ्ठ शहनाज गिल म्हणून भूमिका ऑफर केली होती. तर मी त्यांच्यासमोर हाथ जोडले आणि मी त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्याकडून काहीही करून घ्या, पण मला आता परत लठ्ठ होण्यास नका सांगू. मला माहितीये की मी किती मेहनत करत माझा लठ्ठपणा घालवला आहे. आता माझ्याकडून हे होणार नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चित्रपटसृष्टीत जे नाही ते चांगलं आयुष्य जगतात...

शहनाजनं पुढे सांगितलं की मला तर लठ्ठवाली शहनाज गिल खूप आवडते. जे लोक या चित्रपटसृष्टीत नाही ते खूप चांगलं आयुष्य जगत आहेत. त्यामुळे अशा आयुष्याचा काय फायदा, कारण इथे आपण जे पाहिजे ते खाऊपण शकत नाही. यापेक्षा मी मरणं पसंत करेन. लठ्ठ किंवा बारीक शरीरयष्टी असं काहीही नसतं. तुमच्यात आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. 

हेही वाचा : आराध्याची नवी हेअरस्टाईल पाहिली? गणपती विसर्जनात डान्स करताना दिसली ऐश्वर्याची लेक

शहनाजच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'थॅंक्यू फॉर कमिंग' या चित्रपटात ती दिसणार आहे. तिच्याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री भूमि पेडनेकर, कुशा कपिला आणि डॉली सिंग महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे करण भूलानी यांनी केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही शोभा कपूर, अनिल कपूर, एकता कपूर आणि रिया कपूर यांनी केला आहे.