Shehnaaz Gill च्या जीवनात खास व्यक्तीची एन्ट्री? किस केल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'सिद्धार्थला विसरली का... '

'सिद्धार्थला विसरली का... ' खास व्यक्तीसोबत शहनाजला पाहिल्यानंतर अनेकांनी व्यक्त केली नाराजी...   

Updated: May 6, 2022, 02:53 PM IST
Shehnaaz Gill च्या जीवनात खास व्यक्तीची एन्ट्री? किस केल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'सिद्धार्थला विसरली का... ' title=

मुंबई : 'बिग बॉस 13' फेम अभिनेत्री शहनाज गिल सध्या चर्चेत आहे. सलमान खानच्या ईद पार्टीपासून ती अनेक कारणांनी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी त्यांच्या घरी ईद पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीमध्ये होस्टची भूमिका सलमानने बजावली होती. एवढंच नाही तर पार्टीत सलमान आणि शहनाजचं बॉन्डिंग पाहून अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. 

पार्टीनंतर शहनाज गिल आणि सलमान खानने मीडियासमोर पोज दिली. शहनाजने सर्वांसमोर सलमानला मिठी मारली आणि अभिनेत्याला किस देखील केलं. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

पण शहनाज आणि सलमानला एकत्र पाहिल्यानंतर ट्रोलर्सने अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. एवढंच नाही तर, शहनाजने असं नशेत केलं असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. एका युजरने कमेंटमध्ये 'जेवढं झेपेल तेवढंच मद्यपान करावं....' लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर अन्य एका युजरने, 'तू सिद्धार्थ शुक्लाला एवढ्या लवकर विसरली का?' लिहिलं आहे. सध्या सलमानसोबत शहनाजचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहनाजला अनेकांनी ट्रोल केलं, पण तिच्या काही चाहत्यांनी तिला साथ देखील दिली. शहनाज गिलबद्दलही अशा बातम्या येत आहेत की ती लवकरच सलमान खानच्या बहुप्रतिक्षित सिनेमा 'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.