Shatrughan Sinha on Govinda Accident : काल 1 ऑक्टोबर रोजी गोविंदासोबत दुर्घटना घडली. गोविंदानं चुकून स्वत:वर गोळी झाडली आहे. त्यावेळी त्याला भेटण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार पोहोचले होते. चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन, अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा देखईल यावेळी इथे पोहोचले होते. यावेळी अनेक कलाकारांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला. मात्र, शत्रुघ्न सिन्हानं परिस्थिती सांगितलं आणि सगळ्या चर्चांवर पूर्णविराम लावला.
गोविंदाला भेटल्यानंतर शभुघ्न सिन्हा यांनी मीडियाशी चर्चा केला आणि सांगितलं की 'गोविंदा स्थिर आहे. त्याची हालत चांगली आहे... ही एक दुर्घटना होती. दुर्घटनांमध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही. त्याच्यावर उपचार करण्यात आला आहे. गोळी कशी चालली? अचानक ही घटना कशी घडली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. या सगळ्या प्रश्नांवर शत्रुघ्न सिन्हानं पूर्णविराम लावला आणि स्पष्ट केलं की हा फक्त एक अपघात आहे.' याआधी गोविंदाच्या भावानं हे सांगितलं की अभिनेता ठीक आहे आणि लवकरच त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळेल. त्याशिवाय गोविंदानं स्वत: स्टेटमेंट जारी करत गोळी काढण्यात आल्याची सूचना चाहत्यांना दिली आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पुढे सांगितलं की गोविंदा आता ठीक आहे. अॅनेस्थिशियाचा प्रभाव कमी होतोय. खूप चांगल्या पद्धतीनं तो आता बोलतोय. हा निव्वळ योगायोग होता. अपघात झाला आणि अपघातात काही विशेष असं नव्हतं. कसं झालं, का झालं, असं होत नाही. तसं झालं असतं, अपघात होता... घटना घडली आणि त्यामुळेत तो रुग्णालयात आला आणि लवकरात लवकर त्याचा उपचार झाला. आता तो शुद्धीत आहे, फीट आहे, लोकांना नीट भेटतोय. माझा असा विचार आहे की एक-दोन दिवसात तो घरी परतेल. सगळं काही ठीक आहे.
हेही वाचा : हृतिक आणि सबाच्या अॅनिव्हर्सरी पोस्टवर Ex-Wife ची कमेंट; नेटकऱ्यांना का आली 'जादू'ची आठवण?
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाशी फोनवर बोलले आणि त्याच्या आरोग्याविषयी माहिती दिली. त्याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, 'रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी स्वत: मुख्यमंत्री बोलले आणि त्यांना गोविंदाची संपूर्ण काळजी घेण्याचे आदेश दिले. सीएमओनं एक स्टेटमेंट जारी केलं, ज्यात लिहिलं होतं की मी गोविंदाशी संपर्क केला आणि त्याच्या आरोग्यासंबंधीत माहिती घेतली. मी राज्य सरकार आणि जनतेच्यावतीनं गोविंदाच्या लवकर स्वस्थ होण्यासाठी प्रार्थना करतो.'