पैसा कमवायचे म्हणून..., बहिणीला कठीण काळात एकटं सोडून आली होती शमिता शेट्टी

Shamita Shetty : राज कुंद्रा जेव्हा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकला होता तेव्हा शमितानं शिल्पाला एकटं का सोडलं... याचा खुलासा तिनं केला होता. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 2, 2024, 09:00 AM IST
पैसा कमवायचे म्हणून..., बहिणीला कठीण काळात एकटं सोडून आली होती शमिता शेट्टी title=
(Photo Credit : Social Media)

Shamita Shetty : बॉलिवूड अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीचा आज 2 फेब्रुवारी रोजी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करते. शमिता ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या कामापेक्षा तिचं खासगी आयुष्य हे कायम चर्चेचा विषय ठरला आहे. इतकंच नाही तर जेव्हा राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तेव्हा देखील शमिताला अनेकांनी ट्रोल केलं होतं. इतकंच नाही तर बहीण शिल्पा शेट्टी मोठ्या अडचणीत असताना शमिता तिला एकटीला सोडून थेट बिग बॉस ओटीटीमध्ये गेली होती. त्यावरून देखील तिला ट्रोल करण्यात आलं होतं. या सगळ्यावर शमितानं तिची प्रतिक्रिया देखील दिली होती. 

शमितानं पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा याविषयी खुलासा केला होता की मला खूप वाईट वाटलं होतं की मी शिल्पासोबत तिच्या या कठीण काळात नाही. मी तिच्यासोबत रहायला हवं होतं. कारण मला आठवण आहे की जेव्हा मी ओटीटी शोमध्ये होती तेव्हा शिल्पाविषयी मी सतत विचार करत असायची आणि मला कळत नव्हतं की बाहेर काय होतंय. आम्ही दोघी बहिणी एकमेंकाच्या खूप जवळ आहोत. शिल्पानं ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणाला सांभाळलं आहे. त्यावर मला गर्व आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शमितानं मुलाखतीत हे देखील सांगितलं होतं की या वेळी बिग बॉस ओटीटीमध्ये गेल्यामुळे तिला ट्रोल देखील केलं होतं. त्यालर शमिता म्हणाली, या घटनेशी माझा काही संबंध नव्हता, तरी मला ट्रोल करण्यात येत होतं. यामुळे मी विचार केला की मी देखील आत जाऊ शकते. त्यासोबत जेव्हा तुम्हाला माहितीये की कोव्हिडसारखा काळ सुरु आहे, अशात लोक घरी आहेत. त्यात जर मला काम मिळतंय तर मी त्याचा अनादर करणार नाही. कारण ते समोरून माझ्याकडे आलं आहे. त्याशिवाय मला पैसे देखील कमवायचे होते. त्यामुळे मी बिग बॉसच्या घरात जाण्याचा निर्णय घेतला. 

शमिता फक्त बिग बॉस ओटीटीमध्ये नव्हती तर त्यासोबत तिनं बिग बॉस 15 हा शो देखील केला होता. या दोन्ही शोमधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. शमिताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर मोहब्बतें या चित्रपटातून ती बॉलिवूडमधून पदार्पण केले होते. हा चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता.