'हा फॅमिली शो आहे की...?' नोरा फतेहचा डान्स पाहून नेटकरी संतप्त

Nora Fatehi Dance : नोरा फतेहीचा तो डान्स व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 1, 2024, 06:48 PM IST
'हा फॅमिली शो आहे की...?' नोरा फतेहचा डान्स पाहून नेटकरी संतप्त title=
(Photo Credit : Social Media)

Nora Fatehi Dance : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. तिचे डान्स मुव्ह्ज तर सगळ्यांचे लक्ष वेधतात. नोरा आता अनेक रिअॅलिटी शोमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत स्टेजवर तिचा तगडा डान्स परफॉर्मन्स देताना दिसते. आता नोरानं 'डांस प्लस प्रो' या शोमध्ये असं काही केलं आहे की जे पाहून प्रेक्षक संतापले आहेत. त्यासोबत प्रश्न विचारू लागले आहेत की हा एका कौटुंबिक कार्यक्रमात असं सगळं चालतं का? 

लक्षवेधी गोष्ट म्हणजे नोराचा हा व्हिडीओ डिज्नी प्लस हॉटस्टार आणि नोराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला नोरा स्टेजवर एन्ट्री करताना दिसते, तेव्हा सगळे आनंदी होतात. यावेळी नोरा 'नाच मेरी रानी...' या गाण्यावर डान्स करते आणि यावेळी तिच्या हातात एक पाण्याची बॉटल असते. तर डान्स करत असताना नोरा या बॉटलमधील पाणी तिच्या अंगावर टाकून घेते. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच लोक आश्चर्यचकीत होतात.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोराचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. एकानं लिहिलं की सॉरी, पण 'माझ्या मनात असलेला आदर सगळा गेला आहे. हा कसा घाणेरडा शो आहे?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'वल्गर म्हणजेच अश्लील आहे.' तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'कुटुंबासोबत देखील हा शो पाहू शकत नाही, आता हे सगळं खरंच अश्लील झालं आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला 'हा भारताचा फॅमिली शो आहे?' या शोविषयी बोलायचे झाले तर डिज्नी प्लस हॉटस्टारवर तुम्ही हा शो फ्रीमध्ये पाहू शकतो. या शोमध्ये रेमो डिसूजा हा सुपरजज आहे. तर पुनीत पाठक, शक्ती मोहन, राहुल शेट्टी कॅप्टन आहेत. 

हेही वाचा : ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं सारं... रवीना टंडनाचा मेट्रोतला Video व्हायरल

नोरा गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या डीपफेक व्हिडीओची शिकार झाल्यामुळे चर्चेत आली होती. एक ऑनलाइन शॉपिंग कंपनीच्या प्रमोशनमध्ये कोणत्या दुसरी मॉडेल आहे. मात्र, त्या फोटोत पाहिलं तर  असं वाटतंय की ती नोराच आहे. मात्र, नोरानं स्वत: ते पोस्टर शेअर करत हे खोटं असल्याचं म्हटलं. त्यावेळी तिनं सांगितलं की ती मुलगी दुसरी कोणी आहे.