Shalva Kinjawadekar Mehendi : ओमला खऱ्या आयुष्यात भेटली स्वीटू, शाल्वच्या मेहंदीचे फोटो आले समोर

Shalva Kinjawadekar Mehendi : शाल्वच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचा साखरपुडा झाला होता. 

Updated: Feb 11, 2023, 02:06 PM IST
Shalva Kinjawadekar Mehendi : ओमला खऱ्या आयुष्यात भेटली स्वीटू, शाल्वच्या मेहंदीचे फोटो आले समोर  title=

Shalva Kinjawadekar Mehendi : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Me Nandayla) मालिकेतील ओम आणि स्वीटूच्या (Om Sweetu)  जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही मालिका झी मराठी या वाहिनीवर एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत ओम ही भूमिका अभिनेता शाल्व किंजवडेकरनं (Shalva Kinjawadekar) साकारली होती. तर अभिनेत्री अन्विता फलटणकर (Anvita Phaltankar) स्वीटूच्या भूमिकेत होती. आता शाल्वला खऱ्या आयुष्यात स्वीटू मिळाली आहे. शाल्व लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. शाल्वच्या मेहंदीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

शाल्वच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नुकताच शाल्वचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता त्याच्या मेहंदीचा हा कार्यक्रम करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये शाल्वनं पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहेय तर त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव श्रेया दफळापूरकर असे आहे. श्रेयानं  पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्यांच्या मेहंदी कार्यक्रमातील हे फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो शेअर करत त्याचे चाहते ओमला त्याच्या खऱ्या आयुष्यातील स्वीटू भेटली असे म्हणत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कांचन मेहंदी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या मेहंदीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शाल्वच्या मेहंदी कार्यक्रमात लोकप्रिय मराठी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि तिचा पती अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं (Siddharth Chandekar) हजेरी लावली होती. त्या दोघांना पाहूनही चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

हेही वाचा : 'चंद्रमुखी'साठी मानसी नाईक पहिली पसंती? Amruta Khanvilkar चा खुलासा

शाल्व आणि श्रेया हे दोघं 11 किंवा 12 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. या विवाहसोहळ्यात त्या दोघांच कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित असणार आहेत. त्यामुळे शाल्वच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. दरम्यान, शाल्व आणि श्रेया हे गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या रिलेशनशिपला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी सांगितले होते. त्यावेळी अनेक मुलींचे हृदयाचे तुकडे झाले असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या आधी सर्वांना वाटत होते की शाल्व हा सिंगल आहे. मात्र, अचानक त्यानं शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांना धक्का बसला. श्रेया ही व्यसायानं एक स्टायलिस्ट आहे. तिच्या नावाचं एक फॅशन लेबलसुद्धा आहे