'जवान' चित्रपटाच्या यशादरम्यान 'जवान 2' ची चर्चा सुरू?

Jawan 2 Rumors : सध्या चर्चा आहे ती म्हणजे जवान या चित्रपटाची. आता या चित्रपटाचा पुढचा भाग येणार असल्याची सध्या जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे याबद्दल जोरात चर्चा आहे. यावेळी शाहरूखनंही हिंट दिल्याचे बोललं जात आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 10, 2023, 03:14 PM IST
'जवान' चित्रपटाच्या यशादरम्यान 'जवान 2' ची चर्चा सुरू?  title=
shahrukh khan gives hint of jawan 2 know what are the rumors

Jawan 2 Rumors : शाहरूख खानचा 'जवान' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलो आहे. या चित्रपटानं अल्पावधीच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. यावेळी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. आता हा चित्रपट हीट झाल्यानंतर जवानचा पुढचा भाग येणार आहे याचीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून जवान 2 ची हीट खुद्द शाहरूख खाननचं हिंट दिली आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. नक्की जवानचा पुढचा भाग येणार का आणि यावेळी या पार्टमधून नक्की आपल्यासमोर काय येणार याचीच सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. परंतु नक्की जवान या चित्रपटाची कशावरून चर्चा सुरू झाली याचीच सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या वर्षभरापासून जवान हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची सर्वत्र चर्चा होती. त्यातून आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा रंगलेली आहे. सध्या सोशल मीडियावर सिक्वेलची चर्चा आहे. यावर्षीही बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांचे सिक्वेल ही प्रदर्शित झाले होते.

ज्यांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यावेळी 'गदर 2' या चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगला गल्ला भरला आहे. त्यातून अल्पावधीच हा चित्रपट 500 कोटींच्या घरातही पोहचला आहे. तेव्हा शाहरूखच्याच जवानचा पुढचा भाग कोणाला पाहायला आवडणार नाही? नक्की काय घडलंय यातून पाहुया.

खरंतर 'जवान 2' येणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. परंतु यावर अद्याप निर्मात्यांनी कसलाच शिक्कामोर्तब केलेला नाही. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. परंतु सध्या याच्या फारच अफवा पसरवणं सुरू झालं आहे. त्यातून शाहरूख खानंही हींट दिल्याचे बोललं जात आहे. 

यावेळी एका फॅनशी बोलताना त्यानं ही हिंट दिल्याचे बोललं गेलं आहे. एका फॅननं शाहरूख आणि विजय सेतुपति यांचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो म्हणतो की, सर तुम्ही कालीशी हात का नाही मिळवत नाही. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. तेव्हा शाहरूख म्हणतो की, मी पण त्यांचा खूप मोठा फॅन आहे. मी कालीकडून सर्व पैसे घेतले आणि बाकी लोकांचे पैसेही स्विस बॅंकेत आहेत. मी आता विजाशी वाट पाहत आहे. त्यापुढे शाहरूख हसतो. सधअया यावरून जवानच्या सिक्वेलची चर्चा रंगली आहे. तेव्हा यापुढे काय पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.