सरोगसीद्वारा 'या' कलाकारांच्या घरीही झाले चिमुकल्यांंचे आगमन

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा आई झाली आहे.

Updated: Mar 5, 2018, 04:57 PM IST
सरोगसीद्वारा  'या' कलाकारांच्या घरीही झाले चिमुकल्यांंचे आगमन  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा आई झाली आहे.

सनी लिओनी आणि  डॅनिएल त्यांच्या घरी जुळ्या मुलांचे आगमन झाले आहे. ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून सनीने तिच्या मुलांचा खास फ़ोटो शेअर केला आहे.  

सरोगसीच्या माध्यमातून मुलांचा जन्म  

सनी आणि तिचा पती डॅनिएल यांना सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांचा आनंद मिळाला आहे. यापूर्वी या दांपत्याने एका मुलीला दत्तक घेतले आहे.  सनीने तिच्या मुलांचे नामकरणही केले आहे. अशर सिंह वेबर आणि नोहा सिंह वेबर अशी तिच्या मुलांची नावं आहे. तर निशा ही त्यांची दत्तक मुलगी आहे. 

सनीप्रमाणेच बॉलिवूडच्या इतर कलाकारांनीही सरोगसीच्या माध्यमातून पालक होण्याचा पर्याय निवडला आहे.  

करण जोहर  

करण जोहरही सरोगसीच्या माध्यमातून 'बाबा' झाला आहे. वर्षभरापूर्वी त्याच्या आयुष्यात रूही आणि यश यांचा प्रवेश झाला.  

तुषार कपूर  

अभिनेता तुषार कपूर २०१६ साली सरोगसी आणि आईवीएफच्या माध्यमातून 'बाबा' झाला आहे. तुषारच्या मुलाचे नाव 'लक्ष्य' आहे.  

शाहरूख खान  

शाहरूख खानचा सर्वात लहान मुलगा अब्राहम हा गौरी आणि शाहरूखच्या आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून आला आहे. आर्यन आणि सुहाना ही शाहरूख आणि गौरीची अजून दोन मुलं आहेत.  

सोहेल खान  

सोहेल खान आणि सीमा खानचा दुसरा मुलगा योहान हा सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात आला.  निर्वाण हा त्यांचा मोठा मुलगा आहे.  

आमिर खान  

अभिनेता आमिर खानने २००५ साली किरण रावसोबत लग्न केले. या लग्नानंतर आजाद राव खान या मुलाचा जन्म सरोगसीच्यामाध्यमातून झाला आहे.