पत्नीच्या पहिल्या प्रेमाबद्दल शाहिदला कळताच त्याची अनपेक्षित प्रतिक्रिया.... 

शाहिद आणि मीरा हे बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल्सपैकी एक आहे. पण आता...

Updated: Jan 14, 2022, 05:09 PM IST
पत्नीच्या पहिल्या प्रेमाबद्दल शाहिदला कळताच त्याची अनपेक्षित प्रतिक्रिया....  title=

मुंबई : शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर सध्या पंजाबमध्ये थंडीचा आनंद घेत आहेत. शाहिद आणि मीरा हे बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल्सपैकी एक आहे. त्यांची क्यूट केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची प्रतीक्षा संपवत शाहिद कपूरने मीरासोबतचा एक अतिशय सुंदर व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये, हिवाळ्याच्या सकाळच्या सुंदर झलकमध्ये दोघांचे प्रेमबंध स्पष्टपणे दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये शहीदने एक गुपितही उघड केलं आहे.

एकमेकांवर अपार प्रेम करणाऱ्या कपलमध्ये शाहिद आणि मीरा कपूरचं नाव आघाडीवर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की, शाहिद हे मीराचं पहिलं प्रेम नाही. हे आम्ही म्हणत नसून खुद्द शाहिद कपूरनेच त्याच्या अधिकृत इन्स्टा हँडलवरून याचा खुलासा केला आहे. ही बातमी शाहिद आणि मीराच्या चाहत्यांना धक्का देऊ शकते. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही कारण तिची प्रिय व्यक्ती मीराचा मोबाईल फोनशिवाय तिसरा कोणी नाही.

वास्तविक शाहिदने इन्स्टाग्रामवर पत्नीसोबत हिवाळ्याच्या सकाळचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये, गोंडस कपल एका पार्कमध्ये स्वेटरमध्ये दिसत आहे. व्हिडिओचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे शाहिद काही अंतरावर बसलेली पत्नी मीराला किस करताना दिसत आहे. तर मीरा तिच्या फोनवर इंस्टाग्रमाव पाहत असल्याचं दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत शाहिदने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तिचं पहिलं प्रेम ज्याकडे ती पाहत आहे. पण तिचं दुसरं प्रेम मिळाल्याचा मला आनंद आहे. काय करू, प्रेम असं असतं'. शाहिदच्या कॅप्शनवर गोंडस प्रतिक्रिया देत मीराने लिहिलं, 'नाही, तू माझं पहिलं प्रेम आहेस'. शाहिद आणि मीराचा हा ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जर्सी चित्रपटातील 'बिन तेरे क्या यारा मेरा, साहिबा तो मैं मिर्झा तेरा' हे गाणं व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर वाजत आहे. जे हा व्हिडिओ आणखी रोमँटिक आणि क्यूट बनवत आहे.