शाहिद कपूरने अनन्या पांडेसोबत नेमकं काय केलं की होतेय इतकी चर्चा

अनन्या पांडे पोज आणि बोल्डनेसच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. 

Updated: Jan 11, 2022, 04:41 PM IST
शाहिद कपूरने अनन्या पांडेसोबत नेमकं काय केलं की होतेय इतकी चर्चा title=

मुंबई : चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे पोज आणि बोल्डनेसच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. अनन्या सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. जिथून ती सतत तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे. अलीकडेच अनन्याने स्वतःचा फक्त शर्ट घातलेला असा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून तुम्हीही म्हणाल की, ही अभिनेत्री खूपच हॉट आहे.

घातला फक्त शर्ट 
अनन्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने नारंगी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. यासोबतच तिने हा लूर पूर्ण करण्यासाठी कॅपदेखील घातली आहे. या फोटोमध्ये अनन्या पाण्यात पाय टाकून मागे वळून पाहत आहे. जर तुम्ही फोटो नीट बघितला तर तुम्हाला कळेल की अभिनेत्रीने फक्त शर्ट परिधान केला आहे.

म्हणाली, द्वेष करणारे द्वेषच करतील
अनन्याने तिचे हे फोटो अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर खास कॅप्शनसोबत शेअर केले आहेत. अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिलं- 'द्वेष करणारे द्वेषच करतात.'

शाहिद कपूरने दिली प्रतिक्रिया 
अनन्याचे हे फोटो आणि कॅप्शन पाहून बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर स्वतःला रोखू शकला नाही. अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करत शाहिदने लिहिलं, 'जो पोज देणारे पोजच देईल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्टाईलिश लूक
या फोटोशूटमध्ये अनन्याचा लूक खूपच स्टायलिश दिसत आहे. या फोटोत , अभिनेत्रीने उंच पोनीसह सूक्ष्म मेकअप केला होता. या फोटोमध्ये अनन्याने खूपच लाईट मेकअप केला आहे. तिचा हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने केस ओपन ठेवले आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.