मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा हिच्यासाठी मागील काही महिन्यांचा किंबहुना मागील वर्षभराचा काळ अतिशय आनंद देणारा होता. पहिल्या लग्नातील वादळानंतर दियानं काही काळ एकट्यानं राहण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर तिनं प्रियकर वैभव रेखी याच्याशी लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. (Dia Mirza )
फक्त लग्नच नव्हे, तर पुढे काही महिन्यांनी तिला मातृत्त्वाची चाहूलही लागली.
मुलाच्या जन्मानंतर जणू दियाचं कुटुंब पूर्ण झालं. जीवनातील आनंदाच्या परमोच्च शिखरावर ती बागडतेय असंच तिच्या पोस्ट पाहून वाटू लागलं.
जीनात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी दिया चाहत्यांसोबत शेअर करत असते.
प्रसूतपूर्व काळात अव्यान म्हणजेच आपल्या मुलाचा जन्म झाल्यामुळं त्याला काही काळ एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याचं तिनं मागेच सांगितलं.
आता एका मुलाखतीत दियानं प्रसूदरम्यानचा असा अनुभव शेअर केला जिथं तिनं मृत्यू जवळून पाहिला होता.
असं काय घडलं?
गरोदरपणाच्या पाचव्याच महिन्यामध्ये दियाला एपेंडेक्टोमीला सामोरं जावं लागलं. पुढे सहाव्या महिन्यातही बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये म्हणून तिला रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागल्या.
'माझी प्रसूती करावी लागली कारण, नाळेतून रक्त वाहू लागलेलं. तो काळ फारच आव्हानात्मक होता.
मी खरंच माझ्या डॉक्टरांची (गायनॅकोलॉजिस्ट)खूप ऋणी आहे. ज्यांनी आमचा जीव वाचवला', असं दिया म्हणाली.
एक आई म्हणून शरीरात होणारे बदल ज्याप्रमाणे दियानं पाहिले त्याचप्रमाणे तिनं मृत्यूही जवळून पाहिला.
या काळातही डॉक्टर तिच्यासाठी देवाचं रुप घेऊन धावून आले आणि बाळासह तिचाही जीव वाचवला.