'शाहरुख खान फायटींग आणि डान्समध्ये कच्चा होता...' जॉनी लिव्हरचा खुलासा

अभिनेता शाहरुख खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्याला किंग खान म्हणून ओळखलं जातं.कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यापैकी एक म्हणजे किंग खान. 

Updated: Feb 15, 2024, 02:48 PM IST
'शाहरुख खान फायटींग आणि डान्समध्ये कच्चा होता...' जॉनी लिव्हरचा खुलासा title=

मुंबई : जॉनी लिवर इंडस्ट्रीमधील एक जेष्ठ अभिनेता आहे. त्यांच्या कॉमेडी समोर मोठ मोठे कलाकार फिके आहेत. परफेक्ट टाईमिंग आणि कमाल एक्सप्रेशनने जॉनी यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास ३५० सिनेमांत काम केलं आहे. शाहरुख, सलमान, आमिर, अमिताभ, अनिल कपूरसारख्या सुपरस्टार्ससोबत त्यांनी स्क्रिन शेअर केली आहे. त्यांनी शाहरुख खान आणि सलमानसोबत काम करण्याचा अनुभव आणि काम करण्याची पद्धत सांगितली आहे. 

जॉनी लिवरने बीयर बाइसेप्स नावाच्या यूट्यूब चॅनलसोबत बोलताना आपलं करिअर, धारावीचं जीवन, बॉलिवूडमध्ये होणाऱ्या पार्ट्या आणि याचबरोबर त्यांनी अक्षय, धर्मेद्र आणि गोविंदासारख्या कलाकारांविषयी सांगितली. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की, शाहरुख आणि सलमानचा काम करण्याची पद्धत सांगितली आहे. 

याविषयी बोलताना जॉनी लिवर म्हणाला, ''मी शाहरुख खानसोबत 'बाजीगर'मध्ये काम केलं आहे. त्याआधी तो इतका प्रसिद्ध नव्हता. शूटिंगमध्येही लोक मला त्याच्या आधी ओळखत होते. शाहरुख हा अपकमिंग स्टार होता. त्याने मला खूप प्रेम दिलं. पण शाहरुखसारखा मेहनती माणूस मी कधी पाहिला नाही.  अक्षयलाही मी पाहिलं आहे. तोही खूप मेहनती आहे. पण मेहनत आणि मेहनत यात फरक आहे. जे तुला येतं ते तर तुम्ही करणारच. मात्र तुम्हाला जे येत नाही ती खरी मेहनात.''

''शाहरुख खान फाईटींगमध्ये कमकुवत होता, तो डान्समध्येही कमजोर होता. शाहरुख- सलमान आणि मी, आम्ही 'करण अर्जुन' करत होतो. त्यात सलमान खान फोटो काढायचा. पण शाहरुखमुळे रिटेक घ्यावा लागला. शूटिंग संपल्यानंतर शाहरुख हॉटेलमध्ये जाऊन लॉबीमध्ये सराव करायचा. भरपूर सराव करायचा. सलमान त्यावेळी शाहरुखची खिल्ली उडवायचा. शाहरुखने आपल्या मेहनतीने स्वत:ला घडवलं आहे. तो डान्स आणि फायटिंगमध्येही तो यशस्वी झाला.''

'आम्ही 'बादशाह'चं शूटिंग करत होतो. मेहबूब स्टुडिओमध्ये. तिथे एअर होस्टेस आल्या होत्या. त्या प्रत्येकजण परीसारखा दिसत होत्या. मी सगळ्यांना नमस्कारही केला पण त्या मला नाही शाहरुख खानला हाय हॅलो करत होत्या. मात्र त्यावेळी शाहरुख प्रॅक्टिस करत होता. त्या मुलींनी मला शाहरुखसोबत माझा फोटो काढायला सांगितला. मी जेव्हा शाहरुखशी बोललो तेव्हा त्याने आधीच एकदा फोटो काढला होता. पण नंतर फोटो क्लिक करून रिहर्सल सुरू केली. 

'कुछ कुछ होता है'च्या काळात माझ्या मित्राची बहीणही सेटवर आली होती. मी तिला शाहरुखला भेटवायला घेऊन गेलो. मात्र शाहरुखला पाहून ती बेशुद्ध झाली. ती म्हणाली, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की मी शाहरुखसमोर उभी आहे.

शाहरुख आणि जॉनी यांचं नात खूप छान आहे. दोघांनी एकत्र 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'बाज़ीगर', 'करण अर्जुन', 'कोयला', 'यस बॉस', 'फिर भी दिल है हिन्दुस्तानी', 'चमत्कार', 'चलते-चलते'सारख्या सिनेमात काम केलं आहे. दोघांचं ऑनस्क्रिन टाईमिंहही खूप कमाल होतं. याशिवाय जॉनीने सलमान खानसोबत चोरी चोरी चुपके चुपके', 'हैलो ब्रदर', 'दुल्हन हम ले जाएंगे', 'जब प्यार किसी से होता है' अशा दमदार सिनेमात काम केलं आहे.