'IAS पत्नी करतेय माझा छळ', नितीश भारद्वाज यांनी मांडली व्यथा

Nitish Bhardwaj : महाभारतात कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी IAS पत्नी विरोधात दाखल केली तक्रार!

दिक्षा पाटील | Updated: Feb 15, 2024, 01:25 PM IST
'IAS पत्नी करतेय माझा छळ', नितीश भारद्वाज यांनी मांडली व्यथा title=
(Photo Credit : Social Media)

Nitish Bhardwaj : लोकप्रिय दिग्दर्शक बीआर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेविषयी सगळ्यांनाच माहित आहे. ही मालिका आणि यात काम करणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली होती. या मालिकेत श्रीकृष्णची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज यांचे डायलॉग्स अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहिले. मालिकेत श्रीकृष्ण ही भूमिका साकारत त्यातील सगळ्यांच्या आयुष्यातील समस्या दूर करणाऱ्या नितीश भारद्वाज यांच्या घरात अनेक गोष्टी सुरु आहेत. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नी विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. 

नितीश भारद्वाज यांनी काल बुधवारी पोलिसात या संबंधीत तक्रार देखील केली आहे. नितीश यांनी तक्रारित त्यांच्या पत्नी आयएएस स्मिता भारद्वाज यांच्या विरोधात मानसिक छळाचे आरोप केले आहेत. भोपाळ पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. त्यासोबत भोपाळ कमिश्नरनं अॅडिश्नल एसपी शालिनी दीक्षित या प्रकरणात तपास करणार आहेत. 

हेही वाचा : 'स्लमडॉग मिलियनेयर' नाकारणाऱ्या शाहरुखनं हॉलिवूडमध्ये का नाही केलं काम? त्यानंच केला मोठा खुलासा

नितीश भारद्वाजनं 2009 मध्ये मध्यप्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी स्मिता यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना जुळ्या मुली देखील आहेत. दोघांनी काही वर्ष सुखी संसार केल्यानंतर सतत होणाऱ्या वादाला पाहता विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचा हा खटला कौटुंबिक न्यायालयातही दाखल झाला. जिथे हे प्रकरण प्रलंबित आहे. आता नितीश भारद्वाज यांनी पत्नी स्मिता यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. त्यांनी यात म्हटले की स्मिता या त्यांना त्यांच्या मुलीला भेटू देत नाहीत. तर नितीश भारद्वाज यांचं आयएएस अधिकारी स्मिता यांच्यासोबत असलेलं हे दुसरं लग्न आहे. 

नितीश यांची पहिली पत्नी!

आयएएस अधिकारी स्मिता यांच्याशी लग्न करण्याआधी 27 डिसेंबक 1991 मध्ये नितीश यांनी मोनषा पाटीलशी लग्न केलं होतं. लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. त्यानंतर 2005 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2009 मध्ये नितीश यांनी आयएएस अधिकारी स्मिता यांच्याशी लग्न केलं. मात्र, त्यांच्या लग्नाच्या 10 वर्षानंतर वाद सुरु झाले. तर 2019 मध्ये त्यांनी फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दिला. तिथे अजूनही हे प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान, नितीश यांच्या तक्रारीनंतर पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत.