प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल अशी बातमी! Shah Rukh Khan च्या 'जवान'चं पुणे कनेक्शन ठाऊक आहे का?

Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचं पुण्याशी असलेलं खास कनेक्शन काय माहितीये का? तर नक्कीच वाचा ही बातमी... शाहरुखच्या जवान या चित्रपटाचा प्रीव्ह्यू आज प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या या चित्रपटाच्या प्रीव्ह्यूनं अनेकांना वेड लावलं हे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 10, 2023, 04:45 PM IST
प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल अशी बातमी! Shah Rukh Khan च्या 'जवान'चं पुणे कनेक्शन ठाऊक आहे का? title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा प्रीव्ह्यू नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रीव्ह्यूनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कारण या प्रीव्ह्यूमध्ये शाहरुखचे वेगवेगळे लूक पाहायला मिळाले आहेत. इतकंच नाही तर मेट्रोमधील त्याचा डान्स... हे पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न होता की त्यांनी मेट्रोतील सीन कोणत्या सेटवर शूट केलेत? पण हा कोणताही सेट नसून या सीनचे आणि  पुण्याचे खास कनेक्शन आहे. तर शाहरुखनं हे शूट पुण्यात केल्याचं पुण्याच्या मेट्रोकडून सांगण्यात आलं होतं.  

पुणे मेट्रो रेल्वेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ गेल्या वर्षी शेअर केला होता. जेव्हा चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी शाहरुखच्या मेट्रो समोरचा हा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यानं कोणत्या मेट्रो ट्रेनच्या स्टेटशनवर शूट केलं आहे याविषयी देखील सांगितलं आहे. या मेट्रो रेल्वे स्थानकाचं नाव संत तुकाराम नगर आहे. हा व्हिडीओ शेअर करत पुणे मेट्रो रेल्वेनं सांगितलं की “शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाच्या जाहिरातीत पुणे मेट्रोच्या संत तुकाराम नगर स्थानकाची झलक, पहिला चित्रपट ज्याचे शूटिंग पुणे मेट्रो स्टेशनला झाले” 

दरम्यान, अनेकांना प्रश्न पडला असेल की पुणे मेट्रो स्टेशनवर कसं काय आणि कधी शूट झालं? तर या चित्रपटाचं शूटिंग जवळपास अडीच वर्षांपूर्वी झालं. त्यावेळी संत तुकारामनगर या स्टेशनचे काम पूर्ण झालं होतं. त्या काळात 10 दिवसांसाठी हे स्टेशन चित्रीकरणारासाठी पूर्ण करण्यात आले होते. 

पुणे मेट्रोनं शेअर केलेल्या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिली होती. एक नेटकरी म्हणाला, पुणे मेट्रोला चित्रपटाची जाहिरात करण्याचे किती शुल्क मिळाले याची माहिती द्या. नसेल मिळालेतर जनतेच्या वेळ आणि पैशांचा अपव्यय करू नका. दुसरा नेटकरी म्हणाला, यानं नक्कीच टुरीजमला फायदा होईल. शाहरुखनं मुंबई आणि पुण्याला देखील लोकप्रिय बनवले आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, त्यावेळी मुंबईत लॉकडाऊ होता म्हणून त्यांना मुंबईत शूट करावे लागले. 

हेही वाचा : "डेन्जरस...", Shah Rukh Khan चा Jawan मधील Bald पाहून काही नेटकरी घाबरले

'जवान' विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात शाहरुखच्या दोन भूमिका असणार आहे. जवान चित्रपटात शाहरुखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या दोघांशिवाय चित्रपटात प्रियामणि, सुनील ग्रोव्हर आणि विजय सेतुपति या कलाकारांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. यांच्याशिवाय या चित्रपटात सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा या देखील या चित्रपटात दिसणार आहे. तर संजय दत्त आणि दीपिका पदुकोण या दोघांच्या पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारली आहे. तर हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.