Money Heist वेब सिरीजवरून प्रेरित आहे शाहरुखचा जवान? नेमका काय आहे प्रकार

Shah Rukh Khan's Jawan : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हा मनी हाईस्ट प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 31, 2023, 02:28 PM IST
Money Heist वेब सिरीजवरून प्रेरित आहे शाहरुखचा जवान? नेमका काय आहे प्रकार title=
(Photo Credit : Social Media)

Jawan inspires from Money Heist : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. चित्रपटात शाहरुखचा हटके लूक पाहायला मिळत आहे. त्यात आता 'जवान' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांना काही कळत नाही आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत हा चित्रपट नेटफ्लिक्सवरच्या 'मनी हाईस्ट' या वेब सीरिजवर आधारीत असल्याचे म्हटले आहे. त्यावर आता कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

फरीदून शहरयार यांना दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग डायरेक्टर मुकेश चित्रपट हा नेटफ्लिक्सवरच्या 'मनी हाईस्ट' या वेब सीरिजवर आधारीत किंवा इन्स्पायर असण्यावर म्हणाले की 'जितक्या लोकांना शोधून काढायचं आहे त्यांनी यावर शोध घ्या. जेव्हा जवान प्रदर्शित होईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळेल. ट्रेलरनंतर मला इतके मेसेज आले, पण मी काही सांगितलं नाही. मला फक्त तुम्हाला सगळ्यांना सांगायचे आहे की फक्त प्रतिक्षा करा आणि ती सगळी जादु ही मोठ्या स्क्रिनवर पाहा.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे हा चित्रपट शाहरुखसाठी देखील खास आहे हे सांगत मुकेश म्हणाले की शाहरुख खानसाठी देखील जवान हा चित्रपट खूप खास आहे. इतकंच नाही तर त्याला यावर विश्वास आहे की हा चित्रपट लाखो लोकांची मने जिंकेल. 

2019 मध्ये नेटफ्लिक्सवर मनी हाईस्ट ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. त्या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेला त्यांच्या लीडरचा लूक आणि शाहरुख खानचा या चित्रपटातील लूक मिळता-जुळता असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या चित्रपटात चोरी करण्यासाठी शाहरुख खान त्याच्यासोबत 6 मुलींना घेतो. तर मनी हाईस्टमधील प्रोफेसरकडे देखील अशीच एक टीम असते. 

हेही वाचा : मुलीच्या नादापायी आघाडीच्या अभिनेत्याला 25 मुलांनी बेदम मारलं; पाहून म्हणाल, 'काही गरज होती का...?'

दरम्यान, जवान या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतार, विजय सेतुपति, सान्या मल्होत्रा, प्रियामनी, गिरिजा ओक, संजीता भटाचार्य, रिद्दी डोग्रा आणि सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. तर बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एटलीनं केले आहे. तर हा चित्रपट तमिळ, तेलगू, हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ही शाहरुख खानची पत्नी गौरी खाननं केली आहे.