Pathaan Movie Release : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा बहुचर्चित 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा आज रिलीज होणार आहे. शाहरुखचा हा सिनेमा जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होत आहे, ज्यामुळे तो बॉलीवूडमधील सर्वात मोठा ओपनिंग बनला आहे. त्यामुळे चाहत्यामंध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, पठाण सिनेमाला (Pathaan Movie) विरोध होत असून याबाबत देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने सुरु आहेत. (Shah Rukh Khan's Pathaan Release today )
'पठाण' रिलीज होण्याच्या एक दिवस आधी भागलपूरमध्ये आंदोलन करताना हिंदू संघटनांच्या तरुणांनी सिनेमागृहातील पोस्टर्स फाडून जाळले. उत्तर प्रदेशातील अनेक थिएटर मालकांनी 'पठाण' सिनेमाच्या प्रदर्शनासाठी सुरक्षा मागितली आहे. सीतापूर, चांदौलीसह अनेक ठिकाणी सुरक्षेची मागणी करण्यात आली आहे.
वादाच्या भोवऱ्यात आज 'पठाण' प्रदर्शित होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाहरुखच्या या सिनेमात शाहरुखशिवाय जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा हिंदी पट्ट्यातील सुमारे 4500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे, तर तामिळ आणि तेलुगू स्क्रीन्ससह सुमारे 5000 स्क्रीन्सवर तो रिलीज होणार आहे.
शाहरुख खानचा हा सिनेमा जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होत आहे, ज्यामुळे तो बॉलिवूडमधील सर्वात मोठा ओपनिंग बनला आहे. याआधी 2022मध्ये, हृतिक रोशन, सैफ अली खान आणि राधिका आपटे यांचा बॉलीवूड सिनेमा “विक्रम वेधा” देखील 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतातील आघाडीच्या मल्टिप्लेक्सवर जोरदार आगाऊ बुकिंग नोंदवले आहे, PVR ने जवळपास 500,000 तिकिटे आणि आयनॉक्सने सुमारे 275,000 तिकिटांची नोंद केली आहे. हा चित्रपट भारतभरात 10000 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे.
किंग खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' सिनेमाने रिलीज (Pathaan Movie) होण्याआधीच काही सिनेमांचे रेकॉर्ड मोडण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसासाठी 5 लाखांहून अधिक तिकिटांची विक्रमी आगाऊ बुकिंगसह बंपर ओपनिंग अपेक्षित आहे. सिनेमा रिलीज होण्याआधीच 24 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, शाहरुखने या सिनेमासाठी किती मानधन घेतले याचीही चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखने या सिनेमासाठी तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान अव्वल स्थानावर आहे.