SRK नं Triple रोल करुनही 'हा' चित्रपट आपटला! आता डबल रोल असलेल्या 'जवान'चं काय होणार?

Shah Rukh Khan Tripal Role: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या 'जवान' या चित्रपटाची. या चित्रपटानं सोशल मीडियावर प्रदर्शनाआधीच धुमाकूळ घातला आहे. यापुर्वी एका चित्रपटातून शाहरूखनं तीन भुमिका केल्या होत्या. परंतु हा चित्रपट फारसा गाजला नव्हता. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 2, 2023, 02:32 PM IST
SRK नं Triple रोल करुनही 'हा' चित्रपट आपटला! आता डबल रोल असलेल्या 'जवान'चं काय होणार? title=
shah rukh khan once played triple role in english babu desi meme which got flopped

Shah Rukh Khan Tripal Role: 'जवान' हा शाहरूखचा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. 7 सप्टेंबर रोजी संपुर्ण जगात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. त्यातून यावेळी शाहरूख खानचा यावेळी डबल रोल पाहयला मिळतो आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की याअगोदरही शाहरूख एका चित्रपटासाठी तब्बल तिहेरी भुमिका केली होती. परंतु तेव्हा मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. बॉलिवूडमध्ये आपण अनेकदा डबल रोलच फंडा फार लोकप्रिय झाला होता.

त्यातून शाहरूखनंही अनेकदा अशा लोकप्रिय भुमिका हा करत असतोच. त्यामुळे त्याच्याही लोकप्रियतेही प्रचंड वाढ झाली होती. प्रेक्षकांना त्यानं केलेल्या अशा केलेल्या भुमिकाही आवडू लागल्या होत्या. त्यामुळे त्याच्या या भुमिकाही प्रचंड गाजल्या होत्या. त्याचा जवान हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे आणि सोबतच त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

यापुर्वी असे अनेक कलाकार होते ज्यांनी दुहेरी, तिहेरी भुमिका केल्या होत्या. अभिनेत्रींच्याही डबल रोल्सचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला होता. सीता और गीता असेल किंवा दीपिका पादूकोणनं केलेला चांदनी चौक टू चायना या चित्रपटातील डबल रोल असेल. अशा भुमिकाही गाजल्या आहेत. आता आम्ही सांगतो आहोत तो म्हणजे शाहरूख खानचा 'इंग्लिश बाबू देसी मेम' या चित्रपटाबद्दल. या चित्रपटातून शाहरूखनं एक नाही तर तीन भुमिका या केल्या होत्या. परंतु हा चित्रपट फारसा काही गाजला नव्हता. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या 'जवान' या चित्रपटाची आणि त्यातील डबल भुमिकांची. 

हेही वाचा : अभिनेत्रीच्या वडिलांनी म्हतारपणी केलं चौथं लग्न, आपल्या सावत्र आईला म्हणाली चेटकीण?

english babu desi meme या चित्रपटातून शाहरूख खाननं ट्रीपल रोल केला होता परंतु यावेळी मात्र हा चित्रपट चांगला फ्लॉप झाला होता. हा चित्रपट 27 वर्षांपुर्वी म्हणजेच 1996 साली प्रदर्शित झाला होता. यावेळी शाहरूखसोबत सोनाली बेंद्रेही दिसली होती. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, या चित्रपटानं त्यावर 31 लाखांची कमाई केली होती. विकेंडला हा चित्रपट 1 कोटीपर्यंत पोहचला आणि मग त्या चित्रपटानं 3.78 कोटी रूपये कमावले होते. सध्या शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. त्यातून या चित्रपटानं एडव्हान्स बुकींगमध्येही बाजी मारली आहे.