Shah Rukh Khan ला 'अशा' अवस्थेत पाहून का भडकले चाहते? Photo Viral

अभिनेता शाहरुख खानचा आगामी 'पठान' सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. अनेक वर्षानंतर किंग खान मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री करणार आहे. पण याच दरम्यान एका फोटोमुळे अभिनेता चर्चेत आला असून चाहते देखील त्याच्यावर भडकले आहेत...   

Updated: Dec 8, 2022, 03:41 PM IST
Shah Rukh Khan ला 'अशा' अवस्थेत पाहून का भडकले चाहते? Photo Viral title=

Shah Rukh Khan New Photo : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान (Shah Rukh Khan) ने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. शाहरुखच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रा पार देखील फार मोठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर असलेला शाहरुख 'पठान' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. (Shah Rukh Khan in pathan)

सिनेमाचा आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. नव्या पोस्टमध्ये अभिनेत्याचे कुरळे केस उठून दिसत आहेत. पोस्टरमध्ये अभिनेत्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा रुबाब दिसत आहे. यश राज फिल्म्सच्या ट्विटर अकाउंटवरून शाहरुखच्या नव्या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या पोस्टर तुफान व्हायरल  होत आहे. (shah rukh khan wife)

पण शाहरुखचा नवीन लूक पाहून चाहते भडकले आहेत. कारण शाहरुखच्या आगामी सिनेमाचं एखादं गाणं प्रदर्शित होईल अशी आशा प्रत्येकाला होती. पण अभिनेत्याने चाहत्यांना निराश केल्यामुळे ते भडकले आहेत. याच कारणामुळे सोशल मीडियावर शाहरुखच्या आगामी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. (shah rukh khan net worth)

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा पठाण 25 जानेवारी 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  अनेक वर्षानंतर किंग खान मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री करणार आहे.  म्हणून चाहते किंग खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (shah rukh khan movie)