शाहरुखच्या Bald लूकमध्ये असलेला टॅट्यू तुम्ही पाहिलात का? त्याचा नेमका अर्थ काय... जाणून घ्या

Shah Rukh Khan Jawan Tattoo Meaning : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा प्रीव्हू काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील त्याच्या Bald लूकसोबत त्याच्या कानावर असलेल्या टॅट्यूनं देखील सगळ्यांचे लक्ष वेधले. अनेकांना प्रश्न पडला होता की या टॅट्यूत नक्की काय म्हटलं आहे आता त्याचा अर्थ समोर आला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 14, 2023, 06:32 PM IST
शाहरुखच्या Bald लूकमध्ये असलेला टॅट्यू तुम्ही पाहिलात का? त्याचा नेमका अर्थ काय... जाणून घ्या title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan Jawan Tattoo Meaning : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील शाहरुखचा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाचा प्रीव्ह्यू नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी सगळ्यांचं लक्ष शाहरुखच्या Bald लूकनं वेधले. या चित्रपटातील शाहरुखची भूमिका आणि पटकथा चर्चेत असताना. आणखी एका गोष्टीनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे आणि ते म्हणजे शाहरुच्या Bald मध्ये त्याच्या डोक्यावर असलेला टॅट्यू. त्याच्या टॅट्यूनं अनेकांचे लक्ष वेधले असून त्यात काय म्हटलं आहे असा अनेकांना प्रश्न पडला होता. 

आता शाहरुखच्या डोक्यावर असलेल्या या टॅट्यूत काय लिहिले आहे हे समोर आले आहे. शाहरुख खानने त्याच्या डोक्यावर देवीच्या नावाचा टॅट्यू काढला आहे. ही देवी कोणती आणि त्याचा काय अर्थ आहे हे जाणून घेऊया. ‘जवान’ च्या प्रिव्ह्यूमध्ये शाहरुख खान पहिल्यांदा केसांशिवाय दिसला आणि त्याच्या डाव्या कानावर संस्कृतमध्ये काहीतरी लिहिले होते. टॅट्यूबद्दलचा खुलासा एका ट्रेड अॅनालिस्टनं केला आहे. ‘जवान’ चित्रपटातील शाहरुख खानच्या Bald लूकमधील टॅट्यू संस्कृतमध्ये आहे. 'मां जगत जननी' असे लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ संपूर्ण जगताची आई असा होतो. 

Shah Rukh Khan Jawan bald Tattoo Meaning know in detail

‘जवान’ चित्रपटातील शाहरुख खानच्या भूमिकेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यानं या चित्रपटात डबल रोल केला आहे. त्यातली एक ही हीरोची भूमिका आहे तर दुसरी भूमिका ही खलनायकाची आहे. ‘जवान’च्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये सुरुवातीला असे दिसून आले होते की शाहरुख खान एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, पण शेवटी, तो खलनायकाच्या भूमिकेत दाखवला आहे. अ‍ॅक्शन सीन्स आणि त्यामध्ये विविध कलाकारांची एन्ट्री दाखवल्यामुळे चित्रपट कसा असेल हे पाहण्यास चाहते आतुर आहेत. 

हेही वाचा : Kajol नं 29 वर्षांनी मोडली No Kissing Policy! एक नाही तर दोन कलाकारांबरोबर लिपलॉक

‘जवान’ हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केले आहे. तर गौरी खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहरुख खानसोबत, या चित्रपटात विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि प्रियामणी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट नयनताराचे हिंदी पदार्पण आहे. तर दीपिका पदुकोण आणि संजय दत्तची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे.