प्रेमासाठी नयनतारा झाली होती हिंदू? खऱ्या नावापासून प्रभुदेवासोबतच अफेयर आणि इंटरेस्टिंग लव्ह स्टोरीपर्यंत जाणून व्हाल अवाक्

Jawan Actress Nayantara : शाहरुख खानची हिरोईन जवानमधील नयनताराबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील.   

नेहा चौधरी | Updated: Sep 9, 2023, 10:03 AM IST
प्रेमासाठी नयनतारा झाली होती हिंदू? खऱ्या नावापासून प्रभुदेवासोबतच अफेयर आणि इंटरेस्टिंग लव्ह स्टोरीपर्यंत जाणून व्हाल अवाक् title=
shah rukh khan jawan actress nayanthara religion hindu or christian love life prabhu deva unknown facts

Nayantara Unknown Facts : शाहरुख खानचा जवान चित्रपट जगभरात धुमाकूळ घालतोय.  शाहरुख खानसोबतच या चित्रपटातील स्टार अभिनेत्री नयनताराचा अभिनयाने सर्वांचं मनं जिंकली आहेत. नयनतारा जवानमुळे सध्या चर्चेत असली तरी तिच्या पर्सनल लाइफ टू लव्ह लाइफपर्यंत ती कायम चर्चेत असते. (shah rukh khan jawan actress nayanthara religion hindu or christian love life prabhu deva unknown facts)

कर्नाटकातील बंगलोरमधील जन्मलेली नयनताराला खास परिचयाची तशी गरज नाही. पण तिचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का? नयनताराचं खरं नानव डायना मरियम कुरियन असून ती ख्रिश्चन धर्माची होती. खरं तर तिच्या जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला आहे. यासोबत तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, नयनताराला कधीही अभिनेत्री व्हायचं नव्हतं. नयनताराला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं होतं. मात्र अचानक तिने मॉडेल म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळी दिग्दर्शक अंतिक्कड यांची नजर तिच्यावर गेली. फक्त एकच चित्रपट करणार असं म्हणारी नयनतारा आज टॉपची अभिनेत्री आहे. चित्रपटात काम करण्यासाठी तिने डायना नाव बदलून नयनतारा नाव ठेवलं. 

नयनतारा हिंदू?

मीडियामधून नयनताराला तिच्या धर्माबद्दल अनेकदा प्रश्न विचारले जातात. मध्यंतरी अशी बातमी आली होती की, नयनताराने हिंदू धर्म स्वीकारला आहे. तर ही बातमी खरी आहे. 2011 मध्ये नयनताराने चेन्नईतील आर्य समाज मंदिरात हिंदू धर्म स्वीकरला होता. त्याच्याकडे हिंदू धर्म स्वीकरल्याचं प्रमाणपत्रही आहे. यावर ती म्हणाली की, हिंदू धर्म स्वीकारणे हा माझा वैयक्तिक प्रश्न असून ती माझी निवड आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नयनताराने धर्म का बदलला?

मात्र नयनताराने धर्म का बदलला, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की, तिने प्रेमाखातीर हा निर्णय घेतला आहे. नयनतारा अभिनेता-दिग्दर्शक प्रभुदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांनाही आधीच लग्न करायचे होते. मात्र प्रभुदेवाचे आधीच लग्न झाले होते. हे दोघे 2009 मध्ये एकत्रही राहत होते. त्यावेळी प्रभुदेवाची पत्नी लता हिने धमकी दिली होती. जर तुम्ही नयनताराशी लग्न केलं तर आपण उपोषणावर बसू. ही धमकी आणि सर्व बाजूंनी वाढता दबाव पाहता नयनतारा आणि प्रभुदेवा 2012 मध्ये वेगळे झाले. असं म्हणतात प्रभुदेवासाठी तिने धर्म बदला होता.  

नयनतारा मल्याळी आहे की तमिळ?

नयनतारा अनेकदा प्रादेशिकतेबाबतही गोंधळ निर्माण होते. तिचा जन्म कर्नाटकमधील अशा स्थितीत ती तमिळ आहे, असं काही लोक म्हणतात. तर नयनताराचा जन्म मल्याळी नसरानी कुटुंबात म्हणजेच सीरियन ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. यामुळे काही लोक तिला मल्याळी समजतात.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विघ्नेश शिवनची एन्ट्री 

2015 मध्ये तिच्या आयुष्यात विघ्नेश शिवनची एन्ट्री झाली.  नानुम राउडी धान या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी त्यांची ओळख झाली आणि ते प्रेमात पडले. दोन वर्षांनंतर त्यांनी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये 2017 मध्ये प्रेमाची कबुली दिली. 25 मार्च 2021 मध्ये एंगेजमेंट रिंग दाखवत तिने लग्नाची घोषणाच केली.