'पठाण', 'जवान'ला 'टट्टी' म्हणणाऱ्याला शाहरुखचे सडेतोड उत्तर; म्हणाला, 'तुझ्या प्रॉबलेमवर...'

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं नुकताच चाहत्यांशी संपर्क साधला यावेळी त्याच्या पठाण आणि जवान या चित्रपटांना 'टट्टी' म्हणणाऱ्याला किंग खाननं सडेतोड उत्तर दिलं आहे.

दिक्षा पाटील | Updated: Dec 7, 2023, 12:56 PM IST
'पठाण', 'जवान'ला 'टट्टी' म्हणणाऱ्याला शाहरुखचे सडेतोड उत्तर; म्हणाला, 'तुझ्या प्रॉबलेमवर...' title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan : यंदाचं वर्षे हे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं होतं असं म्हणायला हरकत नाही. शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या दोन चित्रपटांनंतर आता शाहरुखचा 'डंकी' हा चित्रपट लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा सालार हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, नेहमी शाहरुख जसा त्याच्या चाहत्यांशी सोशल मीडियावर चर्चा करताना दिसतो. त्याचप्रमाणे यावेळी देखील त्यानं त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधला. त्यावेळी शाहरुखनं चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली आहे. दरम्यान, शाहरुखचं Ask SRK हे सेशन नेहमीच चर्चेचाविषय ठरतं. तो ज्या प्रकारे त्याच्या चाहत्यांना उत्तर देतो ते नेहमीच चर्चेत राहतं. आता ट्रोल करणाऱ्या एका नेटकऱ्याला शाहरुखनं असं उत्तर दिलं की सगळ्यांना आश्चर्य झालं असून तो नेटकरी देखील शांत झाला.

खरंतर शाहरुख खाननं त्याच्या एक्स म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून ASk SRK हे सेशन ठेवलं होतं. त्यावेळी अनेक नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत रिअॅक्शन दिल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'तुझ्याकडे असलेल्या उत्तम आणि परिणामकारक जाहिरातबाजीमुळे तुझे यापूर्वीचे दोन घाणेरडे (टट्टी म्हणजेच विष्ठेसमान) चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. तर तुला आताही तुझ्या पीआर आणि मार्केटिंग टीमवर विश्वास आहे की डंकी देखील हिट होईल आणि आणखी एक बॉलिवूड गोल्डन टट्टी होईल.'

पाहा काय म्हणाला शाहरुख - 

नेटकऱ्याच्या या ट्वीटवर शाहरुख खाननं सडेतोड उत्तर दिलं आहे. शाहरुख खान म्हणाला, 'सामान्यत: मी तुझ्यासारख्या हुशार लोकांना उत्तर देत नाही. पण तुझ्या बाबतीत मी अपवाद ठरत आहे, कारण मला वाटतं की तुला तुझ्या बद्धकोष्ठतेसाठी उपचार करण गरजेचा आहे. मी माझ्या PR टीमला तुम्हासाठी काही सोनेरी औषधं पाठवायला सांगेन...आशा आहे की तुम्ही लवकर बरे व्हाल.' किंग खानचं हे उत्तर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

हेही वाचा : 'असे चित्रपट करू नकोस'; बॉबी देओलच्या आईनं 'ॲनिमल' पाहताच दिला सल्ला

शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर काही लोकांनी टीका केली आहे तर काहींनी स्तुती केली आहे. काही नेटकऱ्यांनी शाहरुखचा चित्रपटातील लूक आवडला नाही. तर काही नेटकऱ्यांनी चित्रपटातील सगळ्यात जास्त VFX हे शाहरुखच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर राजकुमार हिरानी यांच्या करिअरमधील हा पहिला चित्रपट असेल जो फ्लॉप ठरू शकतो. असे देखील अनेकांनी म्हटले. दरम्यान, 21 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.