राधा-कृष्णाची संगमरवरी मूर्ती ते इतरांना चकवणारा गेट; किंग खानच्या 'मन्नत' ची गुपितं 'या' अभिनेत्यामुळं उघड

Shah Rukh Khan Mannat House : शाहरुख खानच्या मन्नतला पाहण्यासाठी चाहते नेहमी करतात गर्दी... पण त्याच्या घराचं मेन गेट फक्त दाखवण्यासाठी...

दिक्षा पाटील | Updated: Sep 20, 2023, 12:52 PM IST
राधा-कृष्णाची संगमरवरी मूर्ती ते इतरांना चकवणारा गेट; किंग खानच्या 'मन्नत' ची गुपितं 'या' अभिनेत्यामुळं उघड title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan Mannat House : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या मन्नत या घरा बाहेर त्याचे चाहते नेहमीच फोटो काढताना दिसतात. मुंबईत आल्यानंतर शाहरुखच्या बंगल्यासमोर फोटो नाही काढला तर काय केलं असं अनेक लोक बोलताना दिसतात. लाखो मुलींच्या हृदयावर शाहरुख राज्य करतो. शाहरुखच्या या घरासमोर आपल्याला अनेक मुली फोटो काढताना दिसतात. अनेकांना उत्सुकता असते की आत शाहरुखचं घर कसं असणार? पण कोणाला त्याचं घर पाहण्याची संधी मिळत नाही. पण शाहरुखच्या घरात जाऊन आलेला अभिनेता गुलशन देवैयानं मन्नत विषयी एक मोठा खुलासा केला आहे. जे ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल. शाहरुखच्या घरात राधा-कृष्णची संगमरमरची एक मोठी मूर्ती आहे. गुलशननं हे देखील सांगितलं की मन्नतचा मेन गेट जो आहे तो फक्त दाखवण्यासाठी आहे. 

गुलशन देवैयानं सांगितलं की त्याला विश्वास बसत नव्हता की तो त्या पार्टीचा एक भाग होऊ शकतो. तो याविषयी म्हणाला की मी एकदा त्यांना भेटलो आहे. त्यांच्या घरी गेलो होतो. मी तिथे तीन तास घालवले, कारण त्यावेळी मी खूप अस्वस्थ होतो. सुरुवातीचा काही काळ मी खूप नर्व्हस होतो. तिथे इतरही बरेच लोक होते. त्यांच्या घरी एक पार्टी होती आणि मी इथे काय करतोय?, मी येथे येण्यास पात्र नाही. मी येथे आहे त्याचे कारण येथे उपस्थित असलेल्या इतर काही लोकांशी माझी मैत्री आहेस, असं तो स्वत:ला म्हणाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गुलशन देवैया पुढे म्हणाला की 'अनेक गोष्टी आहेत. मला वाटतं की तिथे राधा-कृष्णची संगमरमरची एक मोठी मूर्ती आहे. ती खूपच सुंदर आहे. मोठा डायनिंग टेबल आणि फ्लोरवर खूप प्रकाश. मी संपूर्ण घर पाहिले नाही, कारण आम्ही फक्त त्या भागात होतो जिथे पाहुण्यांना जाण्याची परवानगी होती. तो परिसरच खूप मोठा होता. तो परिसर एका बाजूने सुरू होऊन मुख्य 'मन्नत' म्हणजे जुन्या इमारतीला जोडते. पण प्रत्यक्षात लोकांचं राहण्याचं ठिकाण हे मन्नत एनेक्सचर आहे, जी इमारत मागे आहे.' 

हेही वाचा : मुलांची मराठीत आरती अन् रिसायकल थीमने मूर्ती; रितेश देशमुखच्या घरचा गणपती पाहिलात का?

हेरिटेज प्रॉपर्टी नियमांमुळे या जुन्या वास्तूचे जतन करण्यात आल्याचेही गुलशननं सांगितले. 'मन्नत'चा जो मेन गेट आहे, जिथे सगळे लोक येऊन फोटो काढतात, तो गेट फक्त शोसाठी आहे... त्यांच्या घराचा खरा गेट हा मागे आहे. जिथून मन्नतमध्ये एन्ट्री करता येते', असं गुलशननं सांगितले.