धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या पत्नीच्या किसिंग सीनवर जावेद अख्तर यांची अशी होती प्रतिक्रिया...

Rocky aur Rani Ki Prem Kahani: शबाना आझमी यांच्या आणि धर्मेंद्र (Shabana Azmi and Dharmendra) यांच्या चित्रपटातील किसिंग सीनविषयी जेव्हा जावेद अख्तर यांना कळलं तेव्हा त्यांची कशी प्रतिक्रिया होती याविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 3, 2023, 02:36 PM IST
धर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या पत्नीच्या किसिंग सीनवर जावेद अख्तर यांची अशी होती प्रतिक्रिया... title=
(Photo Credit : Social Media)

Shabana Azmi - Dharmendra Kissing Scene: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील रणवीर सिंग आणि आलिया भट्टची केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण त्याहून जास्त त्यांनी धर्मंद्र आणि शबाना आझमी यांच्या केमिस्ट्रीनं जिंकलं आहे. धर्मेंद्र यांनी रणवीर सिंगच्या आजोबाची भूमिका साकारली आहे. तर त्यांचं जया बच्चन यांच्याशी लग्न झालं असून ते एका घरात अनोळखी व्यक्ती सारखे राहतात. शबाना आझमी या धर्मेंद्र यांच्या गर्लफ्रेंड होत्या. पण लग्नानंतरही धर्मेंद्र त्यांना विसरू शकले नाही. त्यांना एकत्र करण्यासाठी रणवीर प्रयत्न करतो. त्यावेळी धर्मेंद्र आणि शबाना त्या दोघांमध्ये एक किसिंग सीन दाखवण्यात आला आहे. त्यांच्या या किसिंग सीननं सगळ्यांचे लक्ष वेधले. अनेक लोक त्यावर प्रतिक्रिया देत असताना. दरम्यान, त्यांच्या या किसिंग सीनवर त्यांचे पती जावेद अख्तर यांनी कशी प्रतिक्रिया दिली याविषयी आता सांगितलं आहे. 

शबाना आझमी यांनी झूमला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. शबाना म्हणाल्या, त्यांनी सगळ्यात या किसिंग सीनविषयी जावेद अख्तर यांना सांगितले होते. याविषयी सांगत पुढे शबाना म्हणाल्या, 'त्याला काहीही फरक किंवा हरकत नव्हती. पण त्याला एकाच गोष्टीचा फरक पडतो तो म्हणजे माझं बेछुट वागणं. संपूर्ण चित्रपटात ती टाळ्या वाजवत होते, शिट्या मारत होते आणि सगळ्यांना चिअर करत होते. त्याचं असं होतं की माझ्या शेजारी बसलेली ही स्त्री कोण आहे तिला मी ओळखत नाही. मी खूप जास्त उत्साही होते.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटात धर्मेंद्र यांच्या केमिस्ट्रीनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. तर इतक्या वयात त्या दोघांनी हा सीन दिल्यानं अनेकांना आश्चर्य झालं. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करत त्यांना धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांची केमिस्ट्री आवडली. त्यांनी पोस्ट शेअर करत त्यातील अनेक सीन शेअर केले आहेत. 

हेही वाचा : रणवीर सिंगचे आजोबाही त्याच्यासारखेच... वयाच्या 93 व्या वर्षी दाखवला जलवा!

दरम्यान, रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या शिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहरनं केलं आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी झाला आहे.