मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी ऑनलाइन फसवणूकीच्या बळी ठरल्या आहेत. गुरुवारी शबानाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आणि चाहत्यांना अशा फसवणूकीबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. ऑनलाइन पेमेंट घोटाळ्यातील फसवणूकीचा बळी असल्याचं शबाना यांनी सांगितलं. त्यांनी ऑनलाईन शॉपिंग केली आणि अॅडव्हान्स पेमेंट केलं.
शबाना यांनी दारूच्या दुकानातून काही दारु होम डिलिव्हरी मागविली होती.आपल्या ट्विटमध्ये ऑर्डरचं पेमेंट डिटेल शेअर करण्याबरोबरच त्यांनी सांगितलं की, अद्याप माल त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. इतकंच नाही तर, आता जेव्हा त्या दुकानातील नंबरवर कॉल करत आहेत तर, त्यांच्या कॉलला कोणीही उत्तर देत नाही.
ट्विटरवर आपली समस्या सांगत शबाना आझमी यांनी चाहत्यांना अशा फसवणूकीविषयी जागरूक होण्यास सांगितलं. शबाना यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'सावधगिरी बाळगा, मी फसवणूकीची बळी पडले आहे. मी #Living Liquidzची ऑर्डर दिली. यासाठी आधीच पेमेंन्ट दिलं आहे. मात्र अद्याप ती वस्तू मला मिळालेली नाही. त्यांनी माझा फोन उचलणं देखील बंद केलं आहे. मी खाते क्रमांक 919171984427, आयएफएससी- पीवायटीएम0123456 वर पैसे दिले आहेत. हे living liquidzचं पेटीएम बँक खातं आहे.
Finally traced the owners of @living_liquidz & it turns out that the people who cheated me are fraudsters who have nothing to do with Living Liquidz! I urge @mumbaipolice and @cybercrime to take action to stop these crooks from using names of legitimate businesses & scamming us https://t.co/AUobsRg0on
— Azmi Shabana (@AzmiShabana) June 24, 2021
युजर्स म्हणाला - पोलिसांत तक्रार करा
शबानाच्या या ट्विटनंतर लवकरच त्याच्यासोबत फसवणुकीचे हे प्रकरण व्हायरल झालं. चाहत्यांनी आणि युजर्सने त्यांना पुढील कारवाईसाठी सूचना देण्यास सुरवात केली. मुंबईच्या अंधेरी लोखंडवाला-ओशिवारा सिटीझन ऑर्गनायझेशन अशा युजर्सपैकी एक होते. ज्यांनी शबानाच्या ट्विटवर कमेंन्ट देऊन मदतीचा प्रयत्न केला. यासंदर्भात तिने पोलिसात तक्रार दाखल करावी, अशी सूचना या संस्थेने शबाना यांना केली.
शबाना आझमी यांचे पैसे परत मिळतील का?
या संपूर्ण प्रकरणात शबाना आझमी यांचे कोणतेही नवीन अपडेट मिळाली नाही. अशा परिस्थितीत शबाना आझमी पुढे कोणती पावले उचलतात आणि त्यांचे पैसे परत मिळतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण हे स्पष्ट आहे की, लोक एकत्र रूपाने एकमेकांना मदत करीत आहेत, तर असेही काही लोक पैसे कमावण्यासाठी चुकीचे मार्ग वापरत आहेत.