मुंबई : 'बालिका वधू' या मालिकेच्या माध्यमातून बालकलाकाराच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अविका गोर हिचा चेहरा सर्वांच्याच ओळखीचा. तिनं साकारलेली 'आनंदी' कोणीही विसरु शकलेलं नाही. अशी ही लाडकी अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे ते एका खास कारणामुळं.
अविकानं नुकतंच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक अतिशय रोमॅन्टीक पोस्ट शेअर करत आपण रोडीज फेम मिलिंद चांदवानी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं.
मिलिंदसोबतचा फोटो शेअर करत तिनं सर्वांचं लक्ष वेधलं. या फोटोपेक्षा तिच्या कॅप्शननं अनेकांनाच खरं प्रेम म्हणजे काय याची अनुभूती दिली.
'माझ्या सर्व प्रार्थनांचं उत्तर मिळालं आहे. मला माझं आयुष्यभराचं प्रेम मिळालं आहे....', असं लिहित आपल्याला प्रोत्साहन देणारा, विश्वास ठेवणारा जोडीदार मिळाल्यामुलं हे स्वप्नवत वाटत असलं तरीही एक वास्तवात हे घडत असल्याचा आनंद तिनं या कॅप्शनच्या माध्यमातून व्यक्त केला.
आपण इतक्यात विवाहबंधनात अडकणार नसल्याचंही तिनं इथं स्पष्ट केलं. मिलिंदच्या येण्यानं आपलं आयुष्य अगदी परिपूर्ण झाल्याची भावना तिनं व्यक्त केली.
मिलिंद चांदवानी हा आयटी प्रोफेशनल आहे. 'रोडीज रिअल हिरोज'मुळं तो प्रकाशझोतात आला होता.