रामलल्ला दर्शनासाठी पोहोचले टीव्हीचे राम, त्यांच्याच आशीर्वादासाठी लागली भक्तांची रांग!

Arun Govil Video: अरुण गोविल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते फ्लाईटमध्ये बसल्याचं दिसत आहेत. याचबरोबर त्यांच्या चारही बाजूला 'जय श्री राम' घोषणा होताना दिसत आहे. 

Updated: Jan 16, 2024, 06:39 PM IST
रामलल्ला दर्शनासाठी पोहोचले टीव्हीचे राम, त्यांच्याच आशीर्वादासाठी लागली भक्तांची रांग! title=

Ram Mandir Ayodhya: येत्या २२ जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिर प्राण प्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha) हा कार्यक्रम पार पडणार आहे. प्रत्येक भारतीयाच्या नजरा सध्या या कार्यक्रमावर आहेत. मात्र सात दिवसांआधी पासूनच अनुष्ठान सुरु झालं आहे. या कार्यक्रमासाठी पाहुणेमंडळी देखील पोहचू लागले आहेत. रामायण टीव्ही शोमधून घरा-घरात पोहचलेले अरुम गोविल आणि सितेच्या भूमिकेत दिसलेल्या दीपिका चिखलिया  यांनी देखील नुकतीच इथे हजेरी लावली आहे. नुकताच या दोघांनी तेथील काही फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत. तर अनेकांनी अरुण यांना तिथे पाहून त्यांच्या पायाला स्पर्श करत नमस्कार केला.  

अरुण गोविल यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते फ्लाईटमध्ये बसल्याचं दिसत आहेत. याचबरोबर त्यांच्या चारही बाजूला 'जय श्री राम' घोषणा होताना दिसत आहे. त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की,   'राम नाम कर अमित प्रभावा, संत पुरान उपनिषद गावा। आज विमानाव्दारे अयोध्याचे वाल्मिकी हवाई अड्ड्यावर उतरल्यानंतरची काही दृश्य. खूपच सुंदर एअरपोर्ट आहे. जय श्रीराम' 

अरुण गोविल यांना पाहून घोषणा देवू लागले लोकं

अरुण गोविल जेव्हा एअरपोर्टवर उतरले तेव्हा लोकांनी त्यांना घेरलं आणि तिथे त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली आणि जय श्री राम म्हणत त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर सियावर रामचंद्र की जय म्हणत घोषणा दिल्या. काहिंनी तर असही म्हटलंय की, काहींनी असेही सांगितले की त्यांनी नेहमीच या अभिनेत्याला टीव्हीवर पाहिलं होतं आणि आज त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर खूप छान वाटलं.

अनेकजण पाया पडू लागले
व्हिडिओमध्ये काही लोकांनी अरुण गोविल यांना झेंडूच्या फुलांची माळ आणि शाल श्रीफळ गळ्यात घालत त्यांचं अयोध्या नगरीत स्वागत केलं.  अनेकांनी अभिनेत्याच्या पायाला स्पर्श करून हात जोडून त्यांचे आशीर्वाद घेतले. मात्र, सुरक्षा दलाच्या मदतीने अरुणला विमानतळाबाहेर काढण्यात आले आणि ते एका कारमध्ये सुरक्षित मंदिर परिसरात रवाना झाले. ही क्लिप पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'राम पुष्पक विमानातून अयोध्येला पोहोचले आहे.' तर अजून एकजण म्हणाला आहे की, 'आजही लोकांना तुमच्यात श्रीरामाची प्रतिमा दिसते. राम या नावाने मनात येणारा पहिला चेहरा तुमचा!!'