शिवाली परबने 'Love' म्हणत शेअर केला 'या' अभिनेत्यासोबतचा फोटो, चर्चांना उधाण

शिवालीने शेअर केलेल्या फोटोत त्या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. त्यामुळे ते दोघेही एकमेकांना मॅचिंग करताना पाहायला मिळत आहेत.

Updated: Jan 16, 2024, 03:17 PM IST
शिवाली परबने 'Love' म्हणत शेअर केला 'या' अभिनेत्यासोबतचा फोटो, चर्चांना उधाण title=

Shivali Parab Relationship : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला ओळखले जाते. या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार हे प्रसिद्धीझोतात आले. या कार्यक्रमाचे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. याच कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब आणि अभिनेता निमिष कुलकर्णी हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवालीच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या चर्चा रंगल्या आहेत. 

शिवाली परब ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. ती कायम इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तसेच ती तिच्या खासगी आयुष्यातील सर्वच गोष्टी चाहत्यांना पोस्टद्वारे सांगत असते. नुकतंच अभिनेत्री शिवाली परबने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णीसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

यावेळी शिवालीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर निमिषनेही काळ्या रंगाचा टीशर्ट आणि डेनिमचे जॅकेट परिधान केले आहे. यात ते दोघेही एकमेकांना मॅचिंग करताना पाहायला मिळत आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शिवाली परबने "निमिष की निषिम, सब कल की बाते", असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. त्याबरोबरच तिने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. यासोबतच तिने shivaliparab, nimishkulkarni, kalyanchichulbuli, love असे हॅशटॅग दिले आहेत. 

शिवालीने दिलेला लव्ह हॅशटॅग आणि हार्ट इमोजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शिवालीने शेअर केलेल्या या फोटोमुळे ती निमिषसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या या फोटोवर चाहतेही कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या या फोटोवर एकाने 'शिवाली हे खरयं?' अशी कमेंट केली आहे. तर एकाने 'बॉयफ्रेंड की नवरा', असा प्रश्न तिला विचारला आहे. तसेच एकाने मग 'लग्न कधी करताय?' असा प्रश्न त्यांना विचारला आहे. 

दरम्यान सध्या शिवाली ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात झळकत आहे. त्याबरोबरच शिवालीने 'व्हॉट्सअॅप लव्ह' या चित्रपटात काम केले आहे. यासोबच ती 'चंद्रमुखी' या चित्रपटातही झळकली होती. त्यासोबतच 'प्रेम प्रथा धुमशान' या चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. तर निमिषही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातच झळकत आहे. त्याबरोबरच तो ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतही झळकला होता. यासोबतच 'मर्डरवाले कुलकर्णी' या नाटकातही तो काम करत आहे.