Savaniee Ravindrra Blessed With Baby Girl : चिमुकल्या पावलांच सावनी रविंद्रच्या घरी आगमन

शेअर केली अतिशय सुंदर पोस्ट 

Updated: Aug 9, 2021, 06:00 PM IST
Savaniee Ravindrra Blessed With Baby Girl : चिमुकल्या पावलांच सावनी रविंद्रच्या घरी आगमन  title=

मुंबई : आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindrra) आई झाली आहे. सावनीने सोशल मीडियावर याबाबतची गोड बातमी शेअर केली आहे. सावनीने सुंदर व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये तिने आपल्याला गोड मुलगी झाल्याचं म्हटलं आहे. 

 सावनीनं डोहाळे जेवणाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोंत ती अतिशय सुंदर आणि आनंदी दिसत आहे. आता बाळाला जन्म दिल्यानंतर सावनी आणि बाळावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Savaniee Ravindrra (@savanieeravindrra)

6 ऑगस्ट रोजी सावनीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.गायिका सावनी रविंद्र आणि पती डॉ. आशिष धांडे या दोघांच्या आयुष्यात एका चिमुकल्या लेकी आगमन झालं आहे. नुकतंच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार आणि आता ही गोड बातमी त्यामुळे तिच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

सावनीने पोस्ट शेअर करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत सर्वोत्कृष्ट गायिका हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती सावनीने या अगोदर दिली होती.