सौम्या टंडनची 'या' दिवगंत अभिनेत्यासाठी लोकांकडे मदतीची हाक

सोशल मीडियावर कॉमेडियनच्या कुटुंबासाठी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे.

Updated: Aug 13, 2022, 10:54 PM IST
सौम्या टंडनची 'या' दिवगंत अभिनेत्यासाठी लोकांकडे मदतीची हाक title=

मुंबई : अलीकडेच टीव्ही अभिनेता दीपेश भानचं निधन झालं आहे. त्याने अनेक हिट टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी दीपेश भानची सहकलाकार असलेली अभिनेत्री सौम्या टंडन पुढे आली आहे. तिने सोशल मीडियावर दीपेश भानच्या कुटुंबासाठी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे.. भाभी जी घर पर हैं या टीव्ही शोमध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी सौम्या लोकांना दीपेशच्या कुटुंबासाठी पैसे गोळा करण्याचं आवाहन करताना दिसली.

गेल्या महिन्यात जुलै महिन्यात भाभी जी घर पर है या शोमध्ये मलखानची भूमिका साकारणारा अभिनेता दीपेश भान याचं निधन झालं. ब्रेन हॅमरेजमुळे या अभिनेत्याला अचानक प्राण गमवावे लागले. दिपेशच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. या घटनेने त्याच्या सहकलाकारांनाही धक्का बसला आहे.

दिपेश आपल्या मागे पत्नी आणि एक लहान मुलगा सोडून गेला आहे. भाभी जी घर पर है अभिनेत्री सौम्या त्याच्या खूप जवळ होती. त्याने सोशल मीडियावर दिपेशसाठी अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. आता ताज्या व्हिडिओमध्ये सौम्या दीपेशच्या कुटुंबाला मदत करण्याची विनंती करताना दिसत आहे.

दीपेशच्या कुटुंबावर लाखोंचे गृहकर्ज आहे
सौम्याने एक फंड सुरू केला आहे आणि दीपेशच्या घराचं कर्ज फेडता यावं यासाठी प्रत्येकाने आपल्या वतीने योगदान देण्याची विनंती केली आहे. सौम्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये ती म्हणतेय, 'दीपेश, आज आमच्यासोबत नाही. पण त्याच्या अनेक आठवणी आणि अनेक गोष्टी मला आयुष्यभर आठवतील.

त्याचे शब्द मला अजूनही आठवतात. त्याने कर्जावर घेतलेल्या घराबद्दल तो अनेकदा बोलायचा. तो गेला. पण आपल्यासाठी खूप हसू आणि आनंद देवून गेला आता आपण सगळे त्याच्या पाठिशी उभं राहण्याची वेळ आली आहे. आपण ते घर त्याच्या मुलाला परत करू शकतो.

सौम्या पुढे म्हणते की, "मी एक फंड सुरू केला आहे आणि सर्व पैसे त्याच्या पत्नीकडे जातील जेणेकरुन ती कर्जाची परतफेड करू शकेल. तुम्ही कृपया रक्कम कितीही छोटी असली तरीही देणगी द्या, पण आपण मिळून त्याचं हे स्वप्न पूर्ण करू करू शकतो." हा व्हिडिओ शेअर करताना सौम्याने लिहिले की, 'हे माझ्या आतापर्यंतचा सर्वात गोड सहकलाकार दीपेशसाठी. हा व्हिडिओ चांगल्या लोकांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे दाखवतं. प्रत्येक छोटीशी मदत मोलाची असते. दिपेशच्या कुटुंबाला मदत करा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दीपेश भानने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. भाभी जी घर पर हैं, एफआयआर शो, मे आय कम इन मॅडम आणि अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही तो दिसला होता.