Laal Singh Chaddha Box Office Collection: 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. दुसऱ्या दिवशीच चित्रपटाचे अनेक स्क्रिन्स रद्द झाल्याचीही माहिती समोर आली होती तर काही ठिकाणी शोला प्रेक्षकांची गर्दीही फिकी पाहायला मिळाली. अशी परिस्थिती असताना या चित्रपटाला घेऊन उठलेल्या वादंगामुळेच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर परिणाम झाला आहे का? यावरही अनेकांनी मतमतांतरे मांडली आहेत.
बॉलीवूड ट्रेण्ड विश्लेषक तरन आदर्श यांनी नुकतेच एक ट्विट प्रसिद्ध केले आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की boycott calls मुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झालेला नाही ही बाब नाकारू नका. वास्तविक या boycott ट्रेंडचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर परिणाम झालेला आहे, असं ट्विट त्यांनी केले आहे.
त्यांच्या या ट्विटवरून अनेकांनी आपली मतं मांडली आहे तर काहींनी तरन आदर्श यांनाही ट्रोल केले आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर या boycott ट्रेण्डमुळे परिणाम झाल्याचे काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे तर ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांनी मात्र हे नाकारले असून चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन उत्तम असून त्याच्या जोरावरच हा चित्रपट चालेल असा अंदाजही काहींनी लावला आहे. तर आमीरच्या 'दंगल' या चित्रपटाचेही उदाहरण देत त्याला boycott चा शिक्का लागून त्या चित्रपटाने चांगली कमाई केली होती, असंही म्हटलं आहे.
STOP being in denial about #Boycott calls *not* affecting film biz... The fact is, these #Boycott calls *HAVE* made a dent and impacted the #BO numbers of #LaalSinghChaddha specifically... Face it! pic.twitter.com/YjsH1gGet1
— taran adarsh (@taran_adarsh) August 13, 2022
आमीर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप होण्यामागे अनेकांनी आनंदही व्यक्त केला आहे तसेच अनेकांनी आता 'boycott pathan' चाही ट्रेण्ड सुरू केल्याचे समोर येते आहे. परंतु सध्या आत्तापर्यंतची कमाई पाहता 'लाल सिंग चड्ढा'चा यापुढचा बॉक्स ऑफिसवरील प्रवास कसा असेल? हा येणार काळच ठरवले.
'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाने आत्तापर्यंत 12 कोटी रूपयांचा गल्ला भरला असून काही समीक्षकांनी या चित्रपटाला चांगले रिव्ह्यूजही दिले आहेत.