मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाभी जी घर पर है'मधील अनिता भाभी उर्फ सौम्या टंडनच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. सौम्या अनेक दिवसांपासून गरोदर असल्यामुळे सुट्टीवर होती. सौम्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून तिचं हे पहिलं बाळ आहे. या बाळाच्या आगमनाने फक्त सौम्याच्या घरातीलच नाही तर तिचे चाहते देखील खूश झाले आहेत. सध्या सौम्या आणि तिच्या बाळावार शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाभी जी घर पर है या मालिकेतील महत्वाची भूमिका साकारणारी सौम्या खूप दिवसांपासून सुट्टीवर होती. तिने शुक्रवारी 18 जानेवारी रोजी एका मुलाला जन्म दिला आहे. तिच्या या गोड बातमीमुळे संपूर्ण कुटुंब अतिशय आनंदी आहे. सौम्याने आपल्या गरोदरपणातील अनेक फोटो सोशल मीडिया साइटवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये तिचा प्रेग्नेंसी ग्लो दिसत आहे. या गोड बातमीमुळे सौम्या किती खूप होती हे तिच्या फोटोंमधून स्पष्ट होत आहे.
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आई होणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. तिच्या जीवनाला आई या भावनेने खरा अर्थ येतो. काही महिन्यांपूर्वी अनिता भाभी म्हणजे सौम्या आई होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. तिने तिच्या सोशल मीडियावर योगा करतानाचे व्हिडिओ शेअर केले होते.
यानंतर प्रेक्षकांना वाटलं होतं की, सौम्या मालिका सोडून जाईल आणि तिच्या जागी कुणी दुसरी अभिनेत्री येईल पण दिग्दर्शकाने ही गोष्ट नाकारली. या मालिकेत अनिताची भूमिका फक्त सौम्या करेल याची जागा कुणी दुसरी व्यक्ती घेणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. सौम्या अतिशय प्रोफेशनल असून सुट्टीवर जाण्याअगोदर तिने सतत काम केलं आहे. याचा विचार केला जाईल असं ही स्पष्ट झालं होतं.