... म्हणून 'सत्याग्रह'मध्ये Kareena Kapoor ने अजय याला किस करण्यास दिला नकार

'सत्याग्रह' चित्रपटापुर्वी अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले.

Updated: Jul 17, 2021, 11:25 AM IST
... म्हणून 'सत्याग्रह'मध्ये Kareena Kapoor ने अजय याला किस करण्यास दिला नकार title=

मुंबई : अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकाराली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं. आजही या जोडीच्या चर्चा सर्वत्र पसरलेल्या असतात. पण तुम्हाला माहिती आहे एका चित्रपटात करीनाने अजयला किस करण्यास नकार दिला होता. 

'सत्याग्रह' चित्रपटात प्रदर्शिीत होणार होता किस सीन 
2013 साली प्रदर्शित झालेल्या प्रकाश झा दिग्दर्शित 'सत्याग्रह' चित्रपटात अजय आणि करिनाने एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. चित्रपटातील 'रस के भरे तोरे नैन सांवरिया' दोघांचा इंटिमेट सीन होणार होता. तर गाण्याध्ये अजय आणि करीनाला लिपलॉक सीन देखील चित्रीत करायचा होता. पण किसिंग सीन करण्यास करीनाने नकार दिला. 

पण याआधी प्रदर्शित झालेल्या 'ओमकारा' चित्रपटात देखील करीना आणि अजयने इंटीनेट सीन दिले होते. 'सत्याग्रह' चित्रपटात इंटिमेट सीनकरण्यास नकार देण्यामागे कारण होतं. मीडिया रिपोर्टनुसार, प्रकाश झा यांना चित्रपटात किसिंग सीन हवा होता. पण सैफसोबत लग्नामुळे तिने किसिंग सिन करण्यास नकार दिला. 

करीनाच्या एका को-स्टारने सांगितलं की, 'असं नाही की करीनाने कधी बोल्ड सीन केले नाहीत. स्क्रिप्टच्या गरजेनुसार तिने सर्व सीन केले. पण प्रत्येकाला स्वतःसाठी निर्णय घेण्याचा अधिकार असतो. करीनाने लग्नानंतर हा निर्णय घेतला. महत्त्वाचं म्हणजे तिच्या या निर्णयाचं सर्वांनी स्वगत केलं.