सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या बहिणीला एकत्र पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट; म्हणाले...

Sara Tendulkar with Shubman Gill sister Shehneel : सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलची बहीण एकत्र झाली स्पॉट. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Jan 22, 2024, 11:53 AM IST
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या बहिणीला एकत्र पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट; म्हणाले...  title=
(Photo Credit : Social Media)

Sara Tendulkar with Shubman Gill sister Shehneel : सेलिब्रिटीज आणि त्यांचं आयुष्य हे नेहमीच चर्चेत असतं. ते कुठे जातात आणि कोणाला भेटतात या सगळ्या गोष्टी चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची लेक साराच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर शुबमन आणि सारा हे एकमेकांसोबत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. आता अफेअरच्या चर्चांमध्ये सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलची बहिणी एकत्र स्पॉट झाले. 

सारा आणि शुबमनची बहीण शहनिल गिलचा हा व्हिडीओ व्हुम्पला या सेलिब्रिटी फोटोग्राफरनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सारा आणि शहनिल हे एकाच गाडीत बसल्याचे पाहायला मिळते. एका पार्टीनंतर त्या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. सुरुवातीला व्हिडीओत सारा ही पापाराझींना पाहताच तोंड लपवताना दिसते. त्यानंतर काही काळात ती तिच्या चेहऱ्यावर असलेला हात काढते. त्यानंतर शहनिल दिसली तर तिनं ऑलिव्ह ग्रीन रंगाचा मास्क परिधान केला आहे. तर नंतरही सारा यावेळी लाजताना दिसली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सारा आणि शहनिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'ज्या अफवा आहेत त्या खऱ्या आहेत हे आता कळलं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तो रिश्ता पक्का समझें.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अब सारा का सारा सामने आगया है.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'दया काही तरी गडबड आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला की, 'किती ओव्हर अॅक्टिंग करतात.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'तिनं वर्ल्ड कपच्या वेळी देखील असंच केलं होतं.' तर काही नेटकऱ्यांनी साराला पाठिंबा दिला आहे. एक म्हणाला, 'का ते भेटू शकत नाही का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'काय झालं मैत्रिणी एकत्र कुठे जाऊ शकत नाही का?' 

हेही वाचा: ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! एक होता रोमान्सचा किंग

शुभमन आणि साराच्या नात्यावर सारा अली खाननं कॉफी विथ करणमध्ये वक्तव्य केलं होतं. करणनं तिला शुभमन गिलसोबत नाव जोडण्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा सारा अली खान म्हणाली की 'सारा का सारा इंडिया गलत सारा के पिछे पडा है.' त्यानंतर सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या रिलेशनशिपच्या चर्चां पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.