मराठमोळ्या प्रथमेश परबने घेतली सनी देओलची भेट; कारण जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

येत्या ९ फेब्रुवारीला मोहसीन खान दिग्दर्शित 'डिलिव्हरी बॉय' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या सिनेमातील मुख्य अभिनेता प्रथमेश परबने बॉलिवूड अभिनेता सनी देओलची भेट घेतली आहे. 

Updated: Jan 22, 2024, 10:56 AM IST
मराठमोळ्या प्रथमेश परबने घेतली सनी देओलची भेट; कारण जाणून बसेल आश्चर्याचा धक्का title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अनेक मराठी सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. नुकताच पंचक, सत्यशोधक, ओले आले हे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता बरेच सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहे. आईच्या गावात मराठीत बोल, मुसाफिरा, डिलीव्हरी बॉय, याचबरोबर अनेक सिनेमा प्रदर्शानाच्या वाटेवर आहेत. यातच येत्या ९ फेब्रुवारीला मोहसीन खान दिग्दर्शित 'डिलिव्हरी बॉय' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. 

मोहसीन खान दिग्दर्शित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर आपल्या भेटीला आलं होतं. समोर आलेल्या पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही दिसत आहे. त्यामुळे आता प्रथमेश या बाळांची डिलिव्हरी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीला मिळणार आहे. 

प्रथमेश परबने घेतली सनी देओलची भेट
मोहसीन खान दिग्दर्शित 'डिलिव्हरी बॅाय' येत्या ८ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात आता या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा प्रथमेश परब, दिग्दर्शक मोहसीन खान आणि निर्माता डेव्हिड नादर यांनी नुकतीच  सनी देओल यांची भेट घेतली. यावेळी सनी देओल यांनी चित्रपटाच्या टीमला प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे.दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात,  " या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या आमच्या या चित्रपटातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र हे करताना या विषयाचे गांभीर्य  जपत आम्ही त्याला विनोदाची साथ दिली आहे.''

काही दिवसांपूर्वीच 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचं एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यानंतर या चित्रपटातील पहिलं भन्नाट गाणं प्रदर्शित झालं होतं. 'भाऊचा नादखुळा' असे बोल असलेले हे गाणे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापवर चित्रित करण्यात आलं आहे. एनर्जीने भरलेल्या या गाण्यातील दोघांची हूक स्टेप आता अवघ्या महाराष्ट्राला नाद लावलं आहे. एल. के. लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या जबरदस्त आवाजात हे गाणे गायले असून या गाण्याला संगीत देखील त्यांचेच आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करायला येणार आहे.